विविध बँकांचे पोस्ट कार्यालयामार्फत 5 कोटी 23 लाख 12 हजार 377 रुपये नागरिकांना घरात जावून देण्यात आले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. १० : विविध बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी नागरिकांची गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो, ही बाब लक्षात घेऊन केंद्र शासनाने पोस्ट कार्यालयामार्फत इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक ही योजना कार्यान्वीत केली. या योजनेचा जिल्ह्यातील 27 हजार 881 नागरिकांनी लाभ घेतला असून विविध बँकांचे पोस्ट कार्यालयामार्फत 5 कोटी 23 लाख 12 हजार 377 रुपये नागरिकांना घरात जावून देण्यात आले आहेत, अशी माहिती इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकच्या सातारा शाखेचे सरव्यवस्थापक संतोषकुमार यांनी दिली आहे.

यामध्ये ऐअरटेल पेमेंट 9 हजार 930 रुपये, अलाहाबाद बँकेकडून 3 हजार, आंध्रबँक 10 हजार 600, ॲक्सीस बँक 3 लाख 27 हजार 200, बँक ऑफ बरोडा 21 लाख 5 हजार 450, बँक ऑफ इंडिया 46 लाख 1 हजार 381, बॅंक ऑफ महाराष्ट्र 2 कोटी 84 लाख 32 हजार 448, कॅनरा बँक 2 लाख 2 हजार 500, सेंट्रल बँक 6 लाख 13 हजार 600, कॉर्परेशन बँक 1 लाख 69 हजार 200, देना बँक 10 लाख 72 हजार 300, इक्वीटास 1 हजार 900, फेडरल बँक 1 लाख 43 हजार 900, एचडीएफसी बँक 17 लाख 31 हजार 800, आयसीआयसी बँक 18 लाख 3 हजार 114, आयडीबीआय बँक 30 लाख 65 हजार 9, आयडीएफसी फस्ट बँक 7 हजार, इंडियन बँक 1 लाख 33 हजार 600, इंडसईंड 30 हजार 500, आयओबी 82 हजार 600, कर्नाटका बँक 500, कर्नाटका विकास 3 हजार 500, ओबीसी 54 हजार 800, पीएनबी 92 हजार 200, पुरवंचल ग्राम 14 हजार, रत्नाकर बँक 2 हजार 300, सारस्वत को. ऑफ 51 हजार 900, एसबीआय 61 लाख 57 हजार 480, सींडीकेट बँक 2 लाख 6 हजार 100, युबीआय 8 लाख 50 हजार 465, युको बँक 60 हजार 800, युनियन बँक 32 हजार 400, उत्तर बिहार 1 हजार, विदर्भ कोयना 3 हजार 800, विजया बँक 2 लाख 20 हजार 100, एस बँक 10 हजार असे एकूण विविध बँकांचे 5 कोटी 23 लाख 377 रुपयांचे पोस्टामार्फत 27 हजार 881 नागरिकांना घरी जावून देण्यात आलेले आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!