स्थैर्य, अहमदाबाद, दि. 14 : एकीकडे कोरोनाचे मोठे संकट आलेले असताना देशाला इतर अनेक संकटांचाही सामना करावा लागत आहे. कोरोनादरम्यान देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनार्यावर चक्रीवादळ येऊन गेल्यानंतर आता देशातील काही भागात भूकंपाचे धक्के बसत आहेत. आज गुजरातमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संपूर्ण गुजरातमध्ये भूकंपाचे हे धक्के जाणवले असून रिस्टर स्केलवर त्याची तीव्रता 5.5 एवढी नोंदली गेली आहे. या भूकंपाचे केंद्र कच्छमधील बचाऊ येथे जमिनीपासून 10 कि.मी. खाली असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, या भूकंपामुळे रहिवाशांमध्ये भीती निर्माण झाली आहे तसेच लोक घरातून बाहेर पळाले आहेत.