दैनिक स्थैर्य । दि. २१ जुलै २०२२ । सांगोला । सांगोला (जि. सोलापूर) येथे शनिवार, दि. 23 व रविवार दि. 24 जुलै 2022 चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन आयोजीत केले आहे. या संमेलनात ग्रंथ दिंडी, कवीसंमेलन, प्रबोधनपर व्याख्याने यासह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे, अशी माहिती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. आर.एस.चोपडे यांनी दिली.
यावेळी बोलताना प्रा. चोपडे म्हणाले की, चौथे साहित्य सम्मलेन माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ होणार आहे. या सम्मेलनास राज्यातून 40 हजार पेक्षा जास्त विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हे संमेलन दोन दिवस चालणार आहे. शनिवार दि. 23 जुलै रोजी सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत साहित्य दिंडीचा कार्यक्रम होणार आहे. या दिंडीमध्ये 40 सजवलेले रथ, ऐतिहासिक वेश भूषा धारण केलेले विद्यार्थी, शिक्षक कलाकार सहभागी होणार आहेत. या दिंडीमध्ये धनगर जमातीचा इतिहास, धर्म, संस्कृति, साहित्य रूढी, परंपरा, चाली रीती, शैक्षणिक प्रबोधन रथ, सजीव देखावे, लेझीम पथक, भजनी मंडळ, गजी ढोल या बरोबर या साहित्य संमेलनात विचारांची देवाणघेवा होणार असल्याची माहिती यावेळी चोपडे यांनी दिली .
साहित्य नागरीचे नाव ‘संत बाळूमामा नगरी’ असे नाव देण्यात येणार आहे. तसेच ग्रंथ दालनाचे नाव ‘संत कनकदास नगरी’, साहित्य पीठास ‘कवी कालिदास पीठ’ असे नाव देण्यात येणार आहे. यावेळी नवीन सहित्यीकांच्या साहित्याचे प्रकाशन होणार आहे. यावेळी मान्यवरांच्याहस्ते विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेल्या दहाजणांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. दुपारी 3 ते 5 या वेळेत भव्य सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्याचबरोबर सायंकाळी 5.30ते 6.30 वाजता परिसवांद, विषय: धनगर साहित्याचा विविध क्षेत्रावर होणारा परिणाम वक्ते राम लांडे लेखक, नवनाथ गोरे, लेखक प्रा. मुकुंद वलेकर, विषय धनगर सारा एक वक्ते संजय सोनवानी इतिहास संशोधक, लेखक, रात्री 7ते 10 कवी संमेलन होणार आहे. कवी संमेलनाचे अध्यक्ष शिवाजी बंडगर हे भूषविणार आहेत.
रविवार दि. 24 जुलै रोजी सकाळी 9 ते 4.30 पर्यंत विविध विषयांवरती परिसवांद चर्चासत्र अणि व्याख्याने होतील. समारोप सोहळा सांयकाळी 5 ते 7 या वेळेत होणार आहे. संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिमन्यू टकले हे ठराव मांडतील. ना. नितीन गडकरी, ना. अरविंद केजरीवाल, लेखक संजय सोनवणी, मुरहरी केळे, प्रा. यशपाल भिंगे, डॉ. अरुण गावडे, आण्णासाहेब डांगे, राम शिंदे, माजी आमदार रामराव वडकुते, हरिदास भदे, आमदार गोपीचंद पडळकर, दत्तात्रय भरणे, प्रणिती शिंदे विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी माजी नगराध्यक्ष तुषार विरकर, माजी नगराध्यक्ष विजय धट, कृषी विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष कृषीमित्र प्रा. विश्वंभर बाबर, माजी उपनगराध्यक्ष दिपक बनगर, प्रा. के. आर. गावडे, सुधाकर पाटील, रासप माण खटाव विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब पुकळे, संस्थेचे नवनिर्वाचित संचालक लुनेश विरकर, मुख्याध्यापक जी. डी. मासाळ आदी मान्यवर उपस्थित होते.