दैनिक स्थैर्य । दि. ०८ जुलै २०२२ । सातारा । औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सातारा व गजानन ॲटोमोबाईल सातारा यांचे मार्फत डिझेल मेकॅनिक व्यवसायाच्या 48 विद्यार्थ्यांनी दुहेरी प्रशिक्षण पूर्ण केले. या सर्व विद्यार्थ्यांना जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सचिन धुमाळ, सह. प्रशिक्षणार्थी सल्लागार मिलिंग उपाध्ये, गजानन ॲटोमोबाईलचे संचालक सचिन शेळके व प्रविण शेळके यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
यावेळी डिझेल मेकॅनिक व्यवसायाचे निदेशक एस. बी. पावर व ए. आय. शेख यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना या शिक्षण पध्दतीचे महत्व पटवून, प्रत्यक्ष कारखान्यात अत्याधुनिक यंत्रसामुग्री व हत्यारे वापरून प्रात्यक्षिकाचे प्रशिक्षण दिले. अशी शिक्षण पध्दती महाराष्ट्रात सातारा येथे प्रथम कार्यान्वित झालेली आहे. प्रशिक्षणार्थ्यांना नुसते पुस्तकी ज्ञान मिळण्यापेक्षा प्रत्यक्ष कारखान्यात कामाचा अनुभव मिळाल्यास त्यातुन त्यांचे कौशल्य विकसित होते असे सांगितले.