स्थैर्य, फलटण : फलटण शहर व तालुक्यात शुक्रवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा व आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये ७३ जण कोरोना बाधित आले आहेत अशी माहिती प्रांत अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे.
दिनांक २७ व २८ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये कोरोना बाधित आलेले रुग्ण पुढील प्रमाणे, फलटण येथील स्वामी विवेकानंद नगर येथील ६७ वर्षीय पुरुष, महाराजा मंगल कार्यालय परिसरातील ७३ वर्षीय पुरुष, शिवाजी नगर येथील ७४ वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ येथील ३१ वर्षीय महिला, लक्ष्मीनगर येथील ३५ वर्षीय पुरुष, ९० वर्षीय महिला, मलठण येथील २९ व ५६ वर्षीय पुरुष, शिवाजीनगर येथील २८ वर्षीय पुरुष व ६ वर्षीय मुलगा, महात गल्ली येथील ४० वर्षीय पुरुष, रिंग रॉड परिसरातील ३५ वर्षीय पुरुष, २९ वर्षीय महिला व ६ वर्षीय मुलगी, पोलीस कॉलनीतील ४ वर्षीय मुलगी, पद्मावती नगर येथील २३ वर्षीय पुरुष, शुक्रवार पेठ येथील ४५ वर्षीय पुरुष व शहरातील २३ व ३३ वर्षीय पुरुष. तालुक्यातील अलगुडेवाडी येथील ३४ वर्षीय महिला, ४३ वर्षीय पुरुष, कोळकी येथील ३१, ३९, ४५ वर्षीय पुरुष, साखरवाडी येथील २५ व ६० वर्षीय पुरुष व ४६ वर्षीय महिला, बरड येथील १८, ३० व ६० वर्षीय पुरुष, बागेवाडी येथील ३३, ४५ वर्षीय पुरुष व २४, ४०, ६० वर्षीय महिला, बिरदेवनगर (जाधववाडी) येथील ३० वर्षीय पुरुष, वाठार निंबाळकर येथील ९० वर्षीय पुरुष, विडणी येथील २५ वर्षीय पुरुष, कांबळेश्वर येथील ३१ वर्षीय पुरुष, फडतारवाडी येथील २९ वर्षीय पुरुष, बिजवडी ४३ वर्षीय पुरुष, गारपिरवाडी येथील ३१ वर्षीय पुरुष, नाइकबोमवाडी येथील २५, ५५, ८५ वर्षीय पुरुष व ५०, ७७ वर्षीय महिला, कांबळेश्वर ३९ वर्षीय महिला.
शुक्रवार दि. २८ रोजी घेण्यात आलेल्या चाचण्यांमधील चौघे जण कोरोना बाधीत आले असून त्यामध्ये नाईकबोमवाडी येथील ४०, ५५ वर्षीय पुरुष व ५३ वर्षीय महिला, विडणी येथील ४० वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
शनिवार दि. २९ रोजी घेण्यात आलेल्या चाचण्यांमधील २२ जण कोरोना बाधित आले असून या मध्ये माण तालुक्यातील एका महिलेचा समावेश आहे. बाधितांमध्ये शहरातील ३२ वर्षीय पुरुष व ३५ वर्षीय महिला, तालुक्यातील धुळदेवमधील दोन २० वर्षीय तरुण, ५६ वर्षीय पुरुष, साखरवाडीमधील एक पुरुष, ४६ वर्षीय महिला, विडणी येथील २७ वर्षीय महिला, आदर्की खु. येथील ६२ वर्षीय पुरुष, जाधववाडी येथील ३७ वर्षीय महिला, बरड येथील ८५ वर्षीय महिला, पिंप्रद येथील २२ व २५ वर्षीय महिला, साठेफाटा येथील ३० वर्षीय पुरुष, राजाळे येथील २३ वर्षीय पुरुष, सोमंथळी येथील ३५, ६२ वर्षीय पुरुष, २० व ५५ वर्षीय महिला, सस्तेवाडी येथील २३ वर्षीय तरुण, पाडेगाव येथील २२ वर्षीय तरुण व माण तालुक्यातील मोगराळे येथील २५ वर्षीय महिला यांचा समावेश आहे.