२४ तासांत ४६,९६३ नवीन रुग्ण; ४७० जणांचा मृत्यू


 

स्थैर्य, मुंबई, दि.१ : देशातील कोरोनाबाधित रुग्णांची
संख्या कमी झाली असली तर सण-उत्सवानंतर ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.
अनेक राज्यात याचा प्रदुर्भाव दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत देशातील
नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४७ हजारांच्या आसपास गेली आहे. आरोग्य
मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत देशात ४६ हजार ९६३ नवीन
कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर ४७० जणांचा मृत्यू झाला आहे.
देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संक्या ८१ लाख ८४ हजार ८२ इतकी झाली
आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,
देशात आतापर्यंत ७४ लाख ९१ हजार ५१३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या
पाच लाख ७० हजार ४५८ जणांवर उपचार सुरु आहेत. देशातील एकूण कोरोनाबळींची
संख्या एक लाख २२ हजार १११ इतकी झाली आहे.

आयसीएमआरनं दिलेल्या माहितीनुसार, मागील
२४ तासांत देशात १० लाख ९१ हजार २३९ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
दरम्यान, राज्यात शनिवारी ५,५४८ रुग्णांची नोंद झाली, तर ७,३०३ जण
कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासांत ७४ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात
आतापर्यंत एकूण १५ लाख १० हजार ३५३ बाधित बरे होऊन घरी परतले. सध्या २५ लाख
३७ हजार ५९९ व्यक्ती गृहविलगीकरणात, तर १२ हजार ३४२ रुग्ण संस्थात्मक
विलगीकरणात आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!