दैनिक स्थैर्य | दि. १० ऑगस्ट २०२४ | फलटण |
अलगुडेवाडी (ता. फलटण, जि. सातारा) गावच्या हद्दीत सुरू असलेल्या आळंदी – पंढरपूर महामार्गावरील रस्त्यावरील पुलाच्या बांधकामाची केबल वायर अंदाजे २१,५०० रूपये किमतीची अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची फिर्याद गोरख दत्तात्रय गोडसे (रा. सुरवडी) यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
या चोरीचा अधिक तपास म.पो.ना. हेमा पवार करत आहेत.