पावसाळी अधिवेशनात फलटण तालुक्याच्या विकासासाठी ४४ कोटींचा निधी मंजूर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १८ जुलै २०२३ | फलटण |

सध्या राज्य मंत्रिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुरवणी अर्थसंकल्पामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण यांनी फलटण तालुक्याच्या विकासासाठी ४४ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघासाठी भरघोस असा निधी दिल्याबद्दल आमदार दीपक चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विशेष आभार मानले आहेत.

पावसाळी अधिवेशनात मंजूर झालेली विकासकामे व निधी पुढील प्रमाणे :

  • एसएच ११७ ते आदर्की-मिरगाव-फलटण रोड एसएच १४९ किमीपर्यंत सुधारणा. २६/४०० ते २९/८०० भाग रिंगरोड वाठार निंबाळकर फाटा ते वडजल, ता. फलटण जि. सातारा – २.५० कोटी.
  • जिंती साखरवाडी बडेखान नंदल मुळीकवाडी बीबी वाघोशी ताथवडा दर्याचीवाडी गिरवई रोड एमडीआर ८ कि.मी. ४/०० ते ५/०० साखरवाडी जवळ ते गाव ता. फलटण जि. सातारा – १ कोटी.
  • एमडीआर ७ ते पवारवाडी हणमंतवाडी मुंजवडी राजुरी कुरवली बु. मध्ये सुधारणा. अद्रुड जावळी ते एमडीआर १३ रोड एमडीआर ८९ किमी. ६/०० ते ११/०० भाग हणमंतवाडी ते चंडक ९६५ ता. फलटण जि. सातारा – ३ कोटी
  • एमडीआर ६ ते मुरुम पिंपळवाडी फडतरवाडी ते एमडीआर १० रोड एमडीआर १०६ किमी मध्ये सुधारणा. ७/०० ते १०/०० भाग फडतरवाडी फाटा ते फडतरवाडी ता. फलटण जि. सातारा – २ कोटी
  • लोणंद मार्केट कमिटी कापडगाव चव्हाणवाडी आरडगाव हिंगणगाव आदर्की ते एसएच १४९ रस्ता २ स्लॅब ड्रेनेसह कि.मी. ३/७०० आणि ३/९००, रोड किमी. ६/२०० ते ७/०० भाग चव्हाणवाडी ते चांभारवाडी फाटा ता. फलटण जि. सातारा – २ कोटी
  • सुधारणा नांदळ सुरवाडी पिंपळवाडी होळ रोड एमडीआर १२ किमी. ०/०० ते ३/०० भाग नांदल ते सुरवडी ता. फलटण जि. सातारा – २.५० कोटी
  • सुधारणा व रुंदीकरण जिंती साखरवाडी बडेखान नंदल मुळीकवाडी बीबी वाघोशी ताथवडा दर्याचीवाडी गिरवई रोड एमडीआर ८ किमी.१७/०० ते २२/५०० भाग नांदल ते मुळीकवाडी फाटा ता. फलटण जि. सातारा – ४.५० कोटी
  • जिंती साखरवाडी बडेखान नंदल मुळीकवाडी बीबी वाघोशी ताथवडा दर्याचीवाडी गिरवई रोड एमडीआर ८ किमी.५०/०० ते ५२/०० बोडकेवाडी जवळ ते गिरवी ता. फलटण जि. सातारा – २ कोटी
  • एमडीआर ९ ते फडतरवाडी सोमंथली (जुनी रेल्वे लाईन) ते एमडीआर ८७ रोड एमडीआर १०९ किमीमध्ये सुधारणा. १५/५०० ते १६/५०० ता. फलटण जि. सातारा – १ कोटी
  • एमडीआर १३ ते मिरढे बरड निंबाळक टाकळवाडा राजळे रोड एमडीआर ९० किमी मध्ये सुधारणा. ०/०० ते ५/०० भाग मिरढे ते बरड ता. फलटण जि. सातारा – २.५० कोटी
  • तरडगाव कि.मी.जवळ लघु पुलाचे बांधकाम. ०/२०० तरडगाव रावडी रोड वर १३ ता. फलटण जि. सातारा – २.५० कोटी
  • गुणवारे बरड रोड कि.मी.ची सुधारणा. ०/०० ते ३/०० व्हीआर ११७ ता. फलटण जि. सातारा – २ कोटी
  • एमएसएच १५ दुग्ध संघ ते ताम माळ ते फलटण मध्ये सुधारणा. पुसेगाव औंध रोड व्हीआर २४८ किमी. ०/५०० ते ३/०० ता. फलटण जि. सातारा – २ कोटी
  • कापडगाव चव्हाणवाडी चांभारवाडी फाटा रस्ता व्हीआर – ३०२ किमी सुधारणा. ०/०० ते ३/०० ता. फलटण जि. सातारा – २ कोटी.
  • एकूण निधी मंजूर – ४४ कोटी रूपये

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये सरकारमध्ये सामील झाल्यानंतर फलटण कोरेगाव-विधानसभा मतदारसंघासाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्याचा विकास करण्यासाठी प्रलंबित विकासकामांना निधी उपलब्ध करून देऊन ही कामे मार्गी लावली आहेत.

आगामी काळामध्येही फलटण तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सातारा जिल्ह्याचे नेते श्रीमं रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये भरघोस निधी मिळणार आहे, अशी ग्वाही आमदार दीपक चव्हाण यांनी दिली आहे.


Back to top button
Don`t copy text!