शिवसेनाप्रमुखांच्या जयंती निमित्त पंढरपूर शहरातील 42 रक्तदात्यांनी केले रक्तदान…!!

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.२५ जानेवारी २०२३ । पंढरपूर । शिवसेनाप्रमुख, सरसेनापती, हिंदूह्रदयसम्राट, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे युवा सेना पंढरपूर शहराच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन 23 जानेवारी 2023 रोजी करण्यात आले. यावेळी शहरातील 42 रक्तदात्यांनी रक्तदान करून शिवसेनाप्रमुखांना अभिवादन केले. यावेळी युवासेना शहरप्रमुख श्रीनिवास उपळकर यांनी स्तुत्य उपक्रम राबिल्याचं रक्तदात्यांनी म्हटले आहे.
शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण हे ब्रीद वाक्य समोर ठेवून राजकारण केले. त्यामुळेच त्यांनी घालून दिलेल्या आदेशानुसार व विचारांनुसार वाटचाल करीत असताना सध्या रक्तदान हे काळाची गरज बनले आहे. कारण बदलत्या जीवनशैलीमुळे समाजात विविध आजारांचे वाढणारे प्रमाण, वारंवार होणारे अपघात, शस्त्रक्रियांचे वाढते प्रमाण, यामुळे रक्ताला मागणी खूप आहे.
सामाजिक बांधिलकीतून रक्तदाना सारखा पवित्र उपक्रम राबवून शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस अभिवादन करण्यासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे  युवा सेनेचे सोलापूर जिल्हा विस्तारक उत्तमजी आयवळे साहेब यांच्या संकल्पनेतून व युवासेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात एकाच दिवशी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
त्याचा एक भाग म्हणून पंढरपूर शहरामध्ये पंढरपूर युवा सेनेच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले त्यामध्ये 42 रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदविला. या रक्तदान शिबीराला माढा लोकसभा संपर्क प्रमुख साईनाथ भाऊ अभंगराव, जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे, तालुका प्रमुख संजय घोडके, युवक कॉंग्रसचे जिल्हा अध्यक्ष सुनजय पवार, समाजसेवक गणेश भिंगारे, संभाजी ब्रिगेडचे किरणराज घाडगे, स्वागत कदम, समाजसेवक गणेश अंकुशराव, उप-तालुकाप्रमुख विलास चव्हाण, माजी विभाग प्रमुख अशोक उपळकर, जेष्ठ शिवसैनिक काकासाहेब बुराडे, कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष अमर सुर्यवंशी, संदिप शिंदे, यांनी भेट दिली.
शिबीर यशस्वी करण्यासाठी शहरप्रमुख श्रीनिवास उपळकर, शहर समन्वयक स्वप्निल गावडे, उप शहरप्रमुख अतिष काळे, विशाल डोंगरे, अक्षय ढाळे, महेश कारंडे, महेश हिंगमिरे यांनी जबाबदारी पार पाडली.
यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख आकाश माने, उप शहरप्रमुख लंकेश बुराडे, वंचित बहुजन आघाडीचे बबलू बोराळकर, विभाग प्रमुख विजय जाधव, शहर संघटक गणेश घोडके आदी उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!