
स्थैर्य, 24 मार्च, सातारा : पाऊसकाळ लांबणार असल्याने सर्वच धरणातील पाणी राखीव ठेवण्याचे आदेश शासनाकडून झालेले आहेत. कोयना प्रकल्प व्यवस्थापनाने पाणी वापराचा सुयोग्य आराखडा तयार केला आहे. सध्या कोयना धरणात 63.73 टीएमसी पाणीसाठा आहे. त्यामुळे सांगली परिसराला आवश्यक पाणी सोडले असले, तरी सिंचनासाठीचे अद्याप 21 टीएमसी पाणी शिल्लक आहे, तसेच वीज निर्मितीसाठी प्रकल्पात 40 टीएमसी पाणी राखीव ठेवण्यात आले आहे. ऑगस्टपर्यंत पाणी उपलब्धतेसाठी पाच टीएमसी पाणी धरणात राखीव ठेवले जाणार असल्याचे कोयना धरण विभागाने स्पष्ट केले आहे.
या वर्षी अलनिनोचा परिणाम जाणवणार असल्याने पाऊस उशिरा येण्याची व कमी प्रमाणात होण्याचाअंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणी राखीव ठेवण्याच्या सूचना धरणांच्या प्रमुखांना केल्या आहेत. त्यामुळे पाऊस उशिरा येण्याची शक्यता लक्षात घेऊन ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा धरणांमध्ये राखीव ठेवण्याचे आदेश दिले राखीव ठेवण्याच्या सूचना धरणांच्या प्रमुखांना केल्या आहेत. त्यामुळे पाऊस उशिरा येण्याची शक्यता लक्षात घेऊन ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा धरणांमध्ये राखीव ठेवण्याचे आदेश दिले राखीव 21 टीएमसी पाण्यापैकी काही पाणी सोडण्यात येत आहे. साधारण 3600 क्युसेसने पाणी विसर्ग कोयना नदीपात्रात होत आहे. त्यामुळे सांगली भागाचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.
कोयना धरणातून विजनिर्मिती, सिंचन आणि पिण्यासाठी पाणी वापरले जाते; पण सर्वाधिक पाणी हे वीजनिर्मितीसाठी राखीव ठेवावे लागणर आहे. पाऊस उशिरा आला, तर बीज निर्मितीवर परिणाम होऊ नये याची दक्षता घेत 40 टीएमसी पाणी राखीव ठेवले आहे. त्यामुळे वीजनिर्मितीवर परिणाम होणार नाही.
सिंचनासाठी कोयनेतील 21 टीएमसी देणे बाकी आहे. यापैकी काही पाणी सांगलीसाठी कोयनानदीपात्रातून सोडण्यात आले आहे. या पाण्यावर सांगली जिल्ह्यातील टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ या उपसा सिंचन योजना चालतात. या योजनांच्या रब्बी आणि उन्हाळी आवर्तनासाठी कोयना धरणातून, तर म्हैसाळ योजनेसाठी कोयना आणि वारणा धरणातून पाण्याची तरतूद आहे. त्यानुसार पाणी सोडण्यात आले आहे.
इतरत्र पाऊस उशिरा सुरुवात होत असली, तरी कोयनेच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला लवकर सुरुवात होते, तसेच धरणात पाणी येण्यास लवकर सुरुवात होते. त्यामुळे ऑगस्टपर्यंत पुरेल इतके पाणी राखीव ठेवले जात आहे. त्यानुसार पाच टीएमसी पाणी धरणात राखीव ठेवले जाणार आहे.
