आवक कमी झाल्याने 40-50 रु. किलोपर्यंत पोहोचला बटाटा, बटाट्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, दि.८: मान्सून परतीनंतर भाज्यांचे नवे पीक आल्यावर विविध भाज्यांच्या किमती थोड्या घटू शकतात. मात्र, महागड्या बटाट्यामुळे दिलासा मिळण्याची शक्यता नाही. या वर्षी १७ ऑक्टोबरपासून नवरात्र सुरू होत असून २५ ऑक्टोबरला दसऱ्यासह सांगता होणार आहे. नवरात्रीत लोक नऊ दिवसांच्या उपवासात बटाट्याचा जास्त वापर करतात. यामुळे दरवर्षी नवरात्रीदरम्यान बटाट्याची विक्री वाढते. दिल्लीच्या आझादपूर बाजारपेठेत गेल्या काही दिवसांत बटाट्याचा ठाेक भाव १२ ते ५१ रु. प्रतिकिलो चालू आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये बटाट्याची किरकोळ किंमत ४०-५० रु. प्रतिकिलो चालू आहे. इंदूरमध्ये ठोक भाव २२-२४ रु. आणि किरकोळमध्ये ४०-५० रु. किलो चालू आहे. रायपूमध्ये २२ ते २८ सप्टेंबरदरम्यान लॉकडाऊन होता.

रायपूमध्ये २२ ते २८ सप्टेंबरदरम्यान लॉकडाऊन होता. यादरम्यान भाजी मंडई बंद होती आणि रिटेलमध्ये किंमत ८० रु.किलोपर्यंत होती. सोमवारी ठोक किंमत ३२-३७ रु. आणि रिटेलमध्ये ५० रु. किलो राहिली. भोपाळमध्ये एका पंधरवाड्याआधी बटाट्याची किरकोळ किंमत ३०-३५ रु. किलो चालू होती. आता हा भाव ४० रु. किलो आहे. रांचीत ठाेक किंमत २८-३० रु. किलो आणि रिटेल किंमत ३५-४० रु. िकलो चालू आहे. आता हा ४० रु. किलो आहे. दिल्लीत आझादपूर मंडीच्या बटाटे-कांदा व्यापारी संघटनेचे सरचिटणीस राजेंद शर्मा म्हणाले, बटाट्याच्या किमतीतील वाढ प्रामुख्याने या मंडीत आवक घटल्याने झाली. आझादपूर मंडईत बटाट्याची आवक गेल्या वर्षापासून सुमारे ४०-५० टक्के कमी राहिली. यामुळे किमतीत गेल्या वर्षीपेक्षा दुपटीहून जास्तीची वाढ झाली आहे. बटाट्याचे नवे पीक नोव्हेंबरअखेरपर्यंत बाजारात आल्यावर बटाट्याच्या किमतीत घट येईल.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!