स्थैर्य, फलटण, दि.५: जिल्हा प्रशासनाकडून आज 5 ऑक्टोबर 2020 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 4 कोरोना बधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, 22 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात 4 व्यक्ती तर ग्रामीण भागात 18 रुग्ण सापडले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
4 रुग्णाचा मृत्यू
शहरातील पुजारी कॉलनी येथील 63 वर्षीय पुरुष, जाधववाडी ता. फलटण येथील 46 वर्षीय महिला, कोळकी ता. फलटण येथील 75 वर्षीय पुरुष, मुंजवडी ता. फलटण येथील 85 वर्षीय पुरुष, या कोरोना बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
फलटण शहरात 4 कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये, बुधवार पेठ 2, रविवार पेठ 1, पवार गल्ली 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
ग्रामीण भागात 18 कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये आदर्की बु 7, जाधववाडी 6, कापडगाव 2, तरडगाव 1, सासवड 1,पिंप्रद 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.