आतापर्यंत 624 जण उपचार घेऊन घरी तर जिल्ह्यात उपचार घेणारे 141
स्थैर्य, सातारा दि. 20 : विविध रुग्णालयांमध्ये व कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या 4 नागरिकांचा रिपोर्ट कोरोना बाधित आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
कारोनाबाधित रुग्णांमध्ये सातारा शहरातील गुरुवार पेठ येथील 54 वर्षीय महिला, कराड तालुक्यातील तळबीड येथील 26 वर्षीय पुरुष, चोचेगाव येथील 30 वर्षीय महिला, पाटीलवाडी (म्हासोली) येथील 48 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
आतापर्यंत सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 804 इतकी झाली असून, 624 नागरिक त्यातून बरे झाले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 39 नागरिकांचा मृत्यू झाला असून उपचार घेत असलेल्या नागरिकांची संख्या 141 इतकी झाली आहे. बाहेरच्या जिल्ह्यातील 4 बाधित रुग्ण आपल्या जिल्ह्यात उपचार घेत आहेत, त्यांची बाधित रुग्ण म्हणून त्यांच्या जिल्ह्यात गणना केली आहे.त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील बाधितांच्या एकूण संख्येतून ते वजा करण्यात येत आहेत.अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक आमोद गडीकर यांनी दिली आहे.