दैनिक स्थैर्य । दि. १९ ऑक्टोबर २०२२ । मुंबई । ३५० कोटी रूपयांहून अधिक अनपेक्षित विक्रीचा उल्लेखनीय टप्पा गाठल्यानंतर या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन ट्रॅव्हल टेक व्यासपीठाने दिवाळीनिमित्त ग्राहकांना अधिक लाभ देण्यासाठी आणखी एका आठवड्याकरिता त्यांचा भव्य फेस्टिव्ह सीझन सेल वाढवला आहे. कंपनी २३ ऑक्टोबर २०२२ पर्यंत आकर्षक ऑफर्ससह त्यांचा ट्रॅव्हल उत्सव सेल पुन्हा घेऊन येत आहे. या सेलदरम्यान एका भाग्यवान विजेत्याला गेमझीकडून सेदान टाटा टियागो कार जिंकण्याची संधी मिळणार आहे.
ऑफर्सचे अनावरण करत इझमायट्रिप त्यांच्या ग्राहकांना देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमान तिकिटांच्या बुकिंगवर अनुक्रमे जवळपास १४ टक्के व १० टक्के सूटचा लाभ देत आहे. देशांतर्गत हॉटेल्सवर जवळपास २५ टक्के सूट आणि बसवर जवळपास १५ टक्के सूटचा लाभ घेता येऊ शकतो. जवळपास २००० रूपयांच्या कॅब बुकिंग्जवर १४ टक्के सूट आणि रेल्वे तिकिट बुकिंग्जवर जवळपास १०० रूपयांपर्यंत म्हणजेच १० टक्के कॅशबॅकचा देखील लाभ घेता येऊ शकतो. शेवटचे म्हणजे इझमायट्रिप ग्राहकांना प्रति व्यक्ती ७,९०० रूपयांपासून सुरू होणारे हॉलिडे पॅकेजेस आणि प्रति व्यक्ती २६,५०० रूपयांपासून सुरू होणारे क्रूझ पॅकेजेस देत आनंदित करते.
इझमायट्रिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सह-संस्थापक श्री. निशांत पिट्टी म्हणाले, ‘’आम्ही ६ ते १६ ऑक्टोबरपर्यंत सेल कालावधीदरम्यान ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर सेल कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला. आम्ही पुन्हा एकदा आमच्या ट्रॅव्हल उत्सव सेलसाठी मोठी मागणी मिळण्यास आणि सेल सुरू ठेवण्यासोबत ग्राहकांना आणखी एक आठवडा अपवादात्मक सेवा व सूट देण्यास उत्सुक आहोत. आम्ही आमच्या वाढवलेल्या सेल कालावधीमधून अधिकाधिक प्रवाशांना लाभ मिळण्याची आणि सणासुदीच्या काळात प्रियजनांना भेटण्यासाठी आमच्यासह प्रवास करत राहण्याची आशा करतो.’’