दैनिक स्थैर्य । दि.१७ जानेवारी २०२२ । सातारा । श्रीमंत छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) नगरवाचनालय र्काकारी मंडळ व विश्वस्त समितीच्या निवडणूकीसाठी रविवारी वाचनालयाच्या प्रदर्शन हॉलमध्ये १ हजार ८00 मतदानापैकी ६३७ मतदान म्हणजे ३५ टक्के झाले. सकाळी १0 ते दुपारी ४ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची मोजणी सायंकाळी ५ वाजता सुरु करण्यात आली. याचा निकाल रात्री दहा वाजेपर्यंत लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नगरवाचनालयाची निवडणूक यावेळी प्रथमच पॅनेलच्या माध्यमातून होत आहे. या निवडणूकीत ग्रंथमित्र पॅनलच्या माध्यमातून १२ तर चार अपक्ष उमेदवार निवडणूकीच्या आखाड्यात आपले नशिब आजमावत आहेत. यामध्ये विश्वस्त मंडळाच्या ४ जागेसाठी ५ उमेदवार तर कार्यकारणी सदस्य मंडळाच्या ८ जागेसाठी १२ उमेदवार आहेत. या सर्वांच नशिब मतपेटीत बंद झाले आहे. त्याची मतमोजणी सायंकाळी ५ वाजल्यापासून सुरु आहे. सर्वच उमेदवारांना मतदान मोजताना मोठी उत्स्कूता दिसून येत होती.
ग्रंथमित्र पॅनेलमधून १२ उमेदवार रिंगणात आहेत. तर अपक्ष चार जण असून त्यापैकी दोघे श्रीनिवास वारुंजीकर, व अमित द्रविड हे दोघे विश्वस्त व कार्यकारी मंडळासाठी निवडणूक लढवत आहेत.