322 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 682 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, सातारा दि. 29 : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 322  नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले तर 682  जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. 

विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये  जावली तालुक्यातील 18, कराड तालुक्यातील 42, खंडाळा तालुक्यातील 3, खटाव तालुक्यातील 12, कोरेगांव तालुक्यातील 11, महाबळेश्वर तालुक्यातील 6, माण तालुक्यातील 10, पाटण तालुक्यातील 28, सातारा तालुक्यातील 164, वाई तालुक्यातील 28 असे एकूण 322 नागरिकांचा समावेश आहे.

682 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 18, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड 71, फलटण 39, कोरेगांव 34, वाई 44, खंडाळा 75,  रायगांव 32, पानमळेवाडी 85, मायणी 61, महाबळेश्वर 60, दहिवडी 8, खावली 25 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड 130   असे एकूण 682 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.  सुभाष चव्हाण यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने – 44123

एकूण बाधित – 12888

घरी सोडण्यात आलेले – 7109

मृत्यू – 371

उपचारार्थ रुग्ण – 5408




प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!