सातारा जिल्ह्यातील आरोग्य सुविधांसाठी ३० कोटी रुपयांचा प्रस्ताव

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ३० जुलै २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या आरोग्य उपक्रम आणि सुविधांकरिता खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांची भेट घेतली. त्यांच्याकडे तीस कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला आहे या भेटीच्या वृत्तांत जलमंदिर येथून प्रसिद्ध झालेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आला आहे.

पत्रकात नमूद आहे की, राज्य शासनाकडून केंद्राकडे शिफारस झालेल्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांच्या पाच प्रस्तावांपैकी एक प्रस्ताव केंद्र कडे मंजूर करण्यात आला उर्वरित चार कामांची मंजुरी प्रलंबित आहे. यामध्ये उपजिल्हा रुग्णालय कराड येथे शंभर खाटांचे एमसीएच अंर्तगत इमारत बांधकाम करणे , पाटण तालुक्यातील सणबूर या गावात आरोग्य विभागाची मुख्य इमारत व कर्मचारी निवासस्थान नूतनीकरण (6 कोटी 22 लाख) कराड तालुक्यातील वडगाव हवेली येथील तीन कोटी रुपयांचे आरोग्य केंद्र कर्मचारी निवासस्थान बांधकाम व फलटण तालुक्यातील ताथवडे येथे तीन कोटी 65 लाखाची आरोग्य केंद्र कर्मचारी निवास स्थान बांधकाम, महाबळेश्वर येथील साडेचार कोटी रुपयांचे आरोग्य कर्मचारी प्रशिक्षण केंद्र अशी 51 कोटी 35 लाख रुपयांची कामे प्रस्तावित केली होती.

राज्य शासनाकडूनही ही कामे केंद्राकडे शिफारशी सह मंजुरी करता पाठवण्यात आली आहेत. पैकी कराड येथील 33 कोटी 76 लाख रुपयांच्या कामाला केंद्राने मंजुरी दिली आहे. अद्यापही 17 कोटी 59 लाखाच्या कामांना मंजुरी मिळालेली नाही. ही बाब उदयनराजे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली व सिव्हिल हॉस्पिटलच्या अधिकारी कर्मचारी यांच्या निवासस्थानाबाबतचा 30 कोटी रुपयांचा स्वतंत्र प्रस्ताव यावेळी सादर केला. सातारा जिल्ह्यातील पाच आरोग्य प्रस्तावांचे 17 कोटी व कर्मचारी निवासस्थानासाठी 30 कोटी अशा 47 कोटी 59 लाख रुपयांच्या येणाऱ्याचे अंतर्गत कामांना मंजुरी देण्यात यावी, अशी विनंती उदयनराजे यांनी मांडवीय यांच्याकडे केली. या कामांना शक्य तितक्या लवकर मंजुरी देण्याची कार्यवाही करू असे आश्वासन केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी याप्रसंगी दिले आहे असे पत्रकार नमूद करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!