बिल्डर व डेव्हलपरना ३ वर्ष कारावास व दंड; ग्राहक न्यायालयाचे आदेशांचे पालन न केल्याने शिक्षा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०३ नोव्हेंबर २०२२ । सातारा । वाई सातारा येथील बिल्डर व डेव्हलपर राहुल मधुकर गुजर व रोहित मधुकर गुजर यांनी मौजे सोनगीरवाडी, ता. वाई, जि. सातारा येथे मधुविश्व हाईटस या नावाने बहुमजली आर. सी. सी. इमारत बांधण्याची जाहीरात केलेली होती व तेथील पहिल्या मजल्यावर फ्लॅट नं. एफ-02 चे साठेखत ग्राहक v अनिल अर्जुन गलगले यांचेसोबत केले होते. मात्र सदर फ्लॅट विक्रीपोटीची सर्व रक्कम ग्राहकांकडून घेऊन त्यांना इमारतीचे बांधकाम पूर्ण करून फ्लॅटचा ताबा दिला नाही. त्यामुळे अनिल अर्जुन गलगले यांनी ग्राहक न्यायालय सातारा येथे तक्रार दाखल केली. प्रस्तुत तक्रारीचा निकाल ग्राहकाच्या बाजूने लागला व न्यायालयाने दिनांक 08 मे 2017 पासून ग्राहकास रूपये 10,60,000/- रक्कम हाती पडेपर्यंत व्याजासह 9 %  ने अदा करावेत व मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्कम रूपये 5,000/- 45 दिवसात द्यावेत असे आदेश केले होते. मात्र सदर बिल्डर यांनी सदरची रक्कम अदा केली नाही. त्यामुळे अनिल अर्जुन गलगले यांनी बिल्डर व डेव्हलपरने न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नाही म्हणून ग्राहक न्यायालय सातारा येथे फिर्याद याचिका दाखल केली. सदर फिर्यादीचा निकाल देताना कोर्टाच्या आदेशाचे पालन केले नाही म्हणून बिल्डर व डेव्हलपर राहुल मधुकर गुजर व रोहित मधुकर गुजर यांना दिनांक 29 सप्टेंबर 2022 रोजी 3 वर्षे तुरूंगवासाची व प्रत्येकी रक्कम रूपये 5000/-     दंड अशी शिक्षा ठोठावली व सदर दंड न भरल्यास 6 महिने प्रत्येकी साध्या कैदेची शिक्षा ग्राहक न्यायालय, सातारा चे अध्यक्ष मिलींद भिमराव पवार (हिरगुडे), सदस्य दिनेश शंकर गवळी व सदस्य  राहुल प्रकाश पाटील यांनी सुनावली. प्रस्तुतचा निकाल ग्राहकाच्या बाजूने झाल्यामुळे ग्राहकांमध्ये संतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्राहक न्यायालय सातारा यांचेकडून न्याय मिळाल्याबाबत ग्राहक यांनी समाधान व्यक्त केले. प्रस्तुत ग्राहक/फिर्यादी अनिल अर्जुन गलगले यांच्या वतीने ॲङ. विकास प्रल्हाद जगदाळे यांनी काम पाहिले  त्यांना ॲङ ऐश्वर्या सतीश आगुंडे यांनी सहकार्य केले.


Back to top button
Don`t copy text!