दैनिक स्थैर्य । दि. २७ फेब्रुवारी २०२२ । सातारा । एका अल्पवयीन मुलीची छेडछाड करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याने विजय तानाजी निकम (वय 35, रा. आर्वी, ता. कोरेगाव) याला सातारा येथील विशेष न्यायाधीश ए. के. पटणी यांनी 3 वर्षे सक्तमजुरी व 5 हजार रुपये दंड तो दंड न दिल्यास 15 दिवस साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.
याबाबत अधिक माहिती अशी, 28 एप्रिल 2018 रोजी 6 वाजण्याच्या सुमारास आर्वी, ता. कोरेगाव गावच्या हद्दीत विजय निकम याने एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून अश्लील हावभाव करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले होते. याबाबत त्या मुलीने रहिमतपुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर तत्कालीन सपोनि गणेश कानगुडे यांनी या गुन्ह्याचा तपास करून सातारा जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यामध्ये 8 साक्षीदार तपासण्यात आले. त्यानुसार न्यायाधिशांनी आरोपी विजय निकम याला शिक्षा ठोठावली.