मुंबई आणि पुण्यातील घरांच्या किंमतीत ३ टक्क्यांची वाढ : प्रॉपटायगर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १४ जुलै २०२३ । मुंबई । या वर्षातील एप्रिल ते जून कालावधीदरम्यान भारतातील निवासी मालमत्ता बाजारपेठेत घरांच्या किमतीमध्ये सरासरी वार्षिक ६ टक्क्यांची वाढ झाली आहे. महाराष्‍ट्रातील दोन प्रमुख मालमत्ता बाजारपेठा मुंबई व पुणे येथील घरांच्या किंमतीत प्रत्येकी ३ टक्क्यांनी वाढ झाली, जेथे मुंबईमध्ये सरासरी किंमत प्रतिचौरस फूट १०,१०० ते १०,३०० रूपये राहिली, तर पुण्यामध्ये किमती प्रतिचौरस फूट ५,६०० ते ५,८०० रूपये होत्या. देशातील आघाडीची ऑनलाइन रिअल इस्टेट ब्रोकरेज कंपनी प्रॉपटायगरने जारी केलेल्या डेटामधून ही माहिती मिळाली आहे. अहवालात समाविष्ट बाजारपेठांमध्ये मुंबई, पुण्यासहित अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, आणि दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्राचा समावेश आहे.

आघाडीची डिजिटल रिअल इस्टेट ब्रोकरेज कंपनी आणि हाऊसिंगडॉटकॉम व मकानडॉटकॉमचे मालकीहक्क असलेल्या आरईए इंडियाचा भाग असलेली कंपनी प्रॉपटायगरने नुकतेच जारी केलेला अहवाल ‘रिअल इनसाइट रेसिडेन्शियल – एप्रिल-जून २०२३’ मधून निदर्शनास आले की, भारतातील आठ प्रमुख शहरांमधील निवासी मालमत्तांची भारित सरासरी किंमत एप्रिल ते जून कालावधीदरम्यान प्रतिचौरस फूट ७,००० ते ७,२०० रूपयांपर्यंत पोहोचली. गेल्या वर्षाच्या संबंधित कालावधीच्या तुलनेत किमतीत ६ टक्क्यांची वाढ झाली आहे. हा अहवाल भारतातील प्रमुख शहरांमधील रिअल इस्टेट बाजारपेठेच्या विद्यमान स्थितीबाबत बहुमूल्य माहिती देतो.

आरईए इंडियाचे ग्रुप सीएफओ आणि प्रॉपटायगरडॉटकॉम येथील व्यवसाय प्रमुख श्री. विकास वाधवान म्हणाले, “कोविडनंतरच्या काळात भारतातील प्रमुख शहरांमध्ये घरांच्या किमतीत वाढ होत आहे. भांडवल मूल्यांमधील ही वाढ गुंतवणूकदारांचे भारतातील प्रमुख रिअल इस्टेट बाजारपेठांकडे लक्ष वेधून घेत असताना नवीन पुरवठ्यामधील वाढीमुळे किमतीत काहीशी वाढ होत आहे.”

आरईए इंडियाच्या संशोधन प्रमुख श्रीमती अंकिता सूद म्हणाल्या, “गुरूग्राममध्ये व्यवसाय व मोठ्या कंपन्यांकडून मागणीमध्ये वाढ होताना दिसण्यात येत आहे. शहर ग्रेड ए व्यावसायिक विकासासंदर्भात प्रभुत्व राखत आहे, तसेच व्यवसायासाठी अव्वल निवड म्हणून आपले स्थान प्रबळ करत आहे. ही गती कायम राखत गुरूग्राम मालमत्ता बाजारपेठेत लक्झरी व मध्यम विभागाच्या गृहनिर्माणासाठी उत्तम मागणी दिसण्यात आली आहे. २०२३ च्या दुसऱ्या तिमाहीत गुरूग्रामच्या वार्षिक भारित सरासरी मालमत्ता किमतीत १२ टक्क्यांची वाढ दिसण्यात आली, जेथे शहराने बेंगळुरू (९ टक्के) व नोएडा (८ टक्के) या शहरांना मागे टाकले.”

श्रीमती सूद पुढे म्हणाल्या, “दिल्ली व आसपासच्या क्षेत्रांमधील ग्राहक सुधारित सुविधा व सुधारित जीवनशैलीचा शोध घेण्यासोबत पारंपारिक मालमत्ता स्वरूपांमधून स्थलांतरित होत असल्यामुळे मागणीमध्ये वाढ झाली आहे. तसेच मर्यादित पुरवठ्याने देखील किमतीत वाढ होण्याप्रती योगदान दिले आहे.”

जून २०२३ पर्यंतची किंमत रूपये/चौ.फूटमध्‍ये 
शहर २०२३ च्‍या दुसऱ्या तिमाहीत सरासरी किंमत (प्रति चौरस फूट रूपयांमध्‍ये) वार्षिक बदल (टक्‍केवारीमध्‍ये))
अहमदाबाद ३,७००-३,९०० ७ टक्‍के
बेंगळुरू ६,३००-६,५०० ९ टक्‍के
चेन्‍नई ५,८००-६,००० ३ टक्‍के
दिल्‍ली एनसीआर ४,८००-५,००० ६ टक्‍के
गुरूग्राम ७,०००-७,२०० १२ टक्‍के
नोएडा ५,६००-५,८०० ८ टक्‍के
हैदराबाद ६,४००-६,६०० ५ टक्‍के
कोलकाता ४,६००-४,८०० ६ टक्‍के
मुंबई १०,१००-१०,३०० ३ टक्‍के
पुणे ५,६००-५,८०० ३ टक्‍के
भारतव्‍यापी ७,०००-७,२०० ६ टक्‍के

जून २०२३ चा नवीन पुरवठा व इन्‍व्‍हेण्‍टरीनुसार भारित सरासरी किमती

उपलब्ध माहितीनुसार अहमदाबादमध्ये २०२३ च्या दुसऱ्या तिमाहीदरम्यान घरांच्या किमतीत वार्षिक ७ टक्क्यांची वाढ झाली, जेथे घरांच्या किमती प्रतिचौरस फूट ३,७०० ते ३,९०० रूपयांपर्यंत पोहोचल्या. बेंगळुरूमध्ये घरांच्या किमतीत ९ टक्क्यांची वाढ झाली, जेथे घरांच्या सरासरी किमती  प्रतिचौरस फूट ६,३०० ते ६,५०० रूपयांपर्यंत पोहोचल्या.

चेन्नईमध्ये घरांच्या किमती ३ टक्क्यांनी वाढून प्रतिचौरस फूट ५,८०० ते ६,००० रूपयांपर्यंत पोहोचल्या. दिल्ली-एनसीआरमध्ये घरांच्या किमती ६ टक्क्यांनी वाढून प्रतिचौरस फूट ४,८०० ते ५,००० रूपयांपर्यंत पोहोचल्या. दरम्यान, राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील गुरूग्राममधील घरांच्या किमती १२ टक्क्यांनी वाढून प्रतिचौरस फूट ७,००० ते ७,२०० रूपयांपर्यंत पोहोचल्या आणि नोएडामध्ये घरांच्या किमती ८ टक्क्यांनी वाढून प्रतिचौरस फूट ५,६०० ते ५,८०० रूपयांपर्यंत पोहोचल्या.

हैदराबादमध्ये सरासरी घरांच्या किमती ५ टक्क्यांनी वाढून प्रतिचौरस फूट ६,४०० ते ६,६०० रूपयांपर्यंत पोहोचल्या. कोलकातामध्ये घरांच्या किमती ६ टक्क्यांनी वाढून प्रतिचौरस फूट ४,६०० ते ४,८०० रूपयांपर्यंत पोहोचल्या.

श्री. वाधवान पुढे म्हणाले, “किमतीत वाढ होण्यासोबत तारण दरांमध्ये वाढ झाली असताना देखील घरांसाठी मागणी मोठी राहिली आहे. अधिक पुढे जात, आगामी महिन्यांमध्ये गृहकर्जांवरील व्याजदर स्थिर राहण्याची किंवा कमी होण्याची शक्यता असताना आम्हाला घरांच्या मागणीमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे. आमचा ठाम विश्वास आहे की, गृहनिर्माण बाजारपेठ चक्रीय वाढीच्या काळात आहे.”

एप्रिल ते जून कालावधीदरम्यान आठ प्रमुख शहरांमधील घरांच्या विक्रीत वार्षिक ८ टक्क्यांची वाढ झाली, जेथे ८०,२५० सदनिकांची विक्री झाली. विक्रीमधील वाढीचे श्रेय विशेषत: मुंबई व पुण्यामध्ये मागणीत झालेल्या वाढीला जाऊ शकते. गेल्या वर्षाच्या याच कालावधीमध्ये (एप्रिल ते जून २०२२) आठ अव्वल शहरांमधील प्रमुख निवासी बाजारपेठांमध्ये ७४,३२० सदनिकांची विक्री झाली.


Back to top button
Don`t copy text!