माछिलमध्ये घुसखोरी रोखताना सैन्याच्या कॅप्टनसह 3 जवान शहीद, 3 दहशतवाद्यांचा खात्मा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, दि.८: काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यामध्ये रविवारी रात्री पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. माछिल सेक्टरमध्ये पाकिस्तानी सीमेजवळ दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी सैन्याने ऑपरेशन सुरू केले. यादरम्यान 3 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. चकमकीमध्ये सैन्याच्या कॅप्टनसह 3 जवान शहीद झाले आहेत. सैन्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ऑपरेशन अजुनही सुरू आहे.

दहशतवाद्यांकडून जप्त केली एके-47 आणि दोन बॅग


संरक्षण प्रवक्त्यांनी सांगितले की, सैन्याने 7-8 नोव्हेंबरच्या रात्री सीमेमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न हाणून पाडला. घटनास्थळावरुन एके-47 रायफल आणि दोन बॅग आढळले. यानंतर सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!