मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून कोळकीसाठी 3 कोटी 89 लाख मंजूर

भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे माहिती


स्थैर्य, फलटण, दि. 15 नोव्हेंबर : माजी खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या प्रयत्नामुळे शहरालगतची सर्वात मोठी असणारी कोळकी ग्रामपंचायत येथील रस्त्याच्या सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून कोळकी ते शिंदे वस्ती 2 कि.मी सिमेंट काँक्रेट रस्तासाठी 3 कोटी 89 लाख मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीसजयकुमार शिंदे यांनी दिली.
जयकुमार शिंदे म्हणाले, कोळकीचे विकासासाठी निधी कमी पडून देणार हा शब्द माजी खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी दिला आहे. या पूर्वी अभ्यासिका, सभा मंडप, रस्ते, गटरे, ज्येष्ठ नागरिक साठी विरंगुळा केंद्र, बुवा साहेब नगर येथील तालमीसाठी मॅट उपलब्ध करुन दिले आहे, इमारतीसाठी निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे गावाच्या विकासासाठी कमी पडणार नाही.


Back to top button
Don`t copy text!