देऊर येथ चोरट्यांचा धुमाकूळ 3.90 लाखांचे सोने लंपास : सलग दुसर्‍या घरफोडीमुळे पोलिसांसमोर आव्हान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, पिंपोडे बुद्रुक, दि.१६: देऊर ता. कोरेगाव येथे दि 15 जून रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून 3 लाख 90 हजारांच्या किंमतीचे सोने, दागिने लंपास करुन पोबारा केला. ही घटना घडल्याने देऊर तसेच परिसरात एकच खळबळ उडाली आणि परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

याबाबत वाठार पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी दत्तात्रय नानासो कदम रा. देऊर व त्यांचे नातेवाईक यांनी सोमवार दि. 14 रोजी रात्री घरामध्ये आंबे पिकायला घालून रात्रीच्या दीडच्या सुमारास घराच्या पाठीमागील दरवाजाला कडी न लावताच झोपी गेले. त्यानंतर कोणीतरी अज्ञात चोरट्याने रात्रीच्या सुमारास मागील दाराने घरात प्रवेश करून अडीच तोळे वजनाचे सोन्याचे तीन पदरी गंठण, साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे पट्टीचे गोल आकाराचे झुमके, दीड तोळे वजनाची सोन्याची साखळी, एक तोळे वजनाचे सोन्याचे कानातील फुले, अर्धा तोळे वजनाचे सोन्याचे कर्णफुले, अर्ध्या तोळ्याची चौकोनी सोन्याची अंगठी, असा एकूण 3 लाख 90 हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज लंपास केला असल्याची तक्रार दत्तात्रय नानासो कदम यांनी वाठार पोलीस स्टेशनला दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!