सातारा पालिकेच्या प्रारुप मतदार यादी वर २९६ हरकती दाखल; प्रशासक मुख्याधिकारी अभिजित बापट घेणार हरकतींची सुनावणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०२ जुलै २०२२ । सातारा ।  सातारा पालिकेच्या प्रारुप मतदार यादी संदर्भात हरकती घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण वेगवेगळ्या प्रभागातून 296 हरकती दाखल झाले आहेत. या हरकतींची लवकरच सुनावणी घेण्यात येणार असून पाच तारखेला प्रभागनिहाय अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे तर नऊ तारखेला प्रभाग आणि केंद्र निहाय यादी अंतिम केली जाणार आहे अशी माहिती मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिली आहे.

सातारा शहरांमध्ये पंचवीस प्रभागातून पन्नास उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत. सातारा शहराच्या हद्दवाढीलानंतर शहराची लोकसंख्या एक लाख 80 हजार 560 असून त्यापैकी प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेमध्ये 1,42,003 मतदारांचा मतदानाच्या माध्यमातून सहभाग असणार आहे. प्रारुप मतदार यादीसंदर्भामध्ये बऱ्याच प्रभागात नाव एकीकडे आणि मतदान दुसरीकडे असे प्रकार घडले आहेत. काही नावांच्या पुढे डिलीट पडल्यामुळे मतदारांचा गोंधळ वाढला आहे. प्रभाग रचनेमध्ये काही प्रभागातील नावे अर्धवट पट्ट्यामुळे पलीकडच्या प्रभागात गेली असून काही ठिकाणी मतदारांच्या फोटो समोरील नावे चुकली आहेत. काही ठिकाणी पुरुष मतदारांच्या समोर स्त्री मतदाराचे नाव पडले आहेत तर स्त्री मतदाराच्या फोटोस व पुरुष मतदाराचे नाव पडले आहे. या तांत्रिक चुकांदुकान संदर्भात गेल्या पाच दिवसापासून सातारा शहरात हरकती नोंदवून घेतल्या जात होत्या. पालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात हरकती नोंदविण्याची प्रभागनिहाय काम सुरू होते. ती मुदत शुक्रवार दिनांक 11 रोजी सायंकाळी पाच वाजता संपली. सातारा शहरातून आज अखेर एकूण 296 तक्रारी दाखल झाले आहेत. ज्या प्रभागात संदर्भात तक्रारी आहेत त्या तक्रारींची छाननी करून बूथ लेव्हल ऑफिसर प्रभाग निरीक्षक आणि मुख्याधिकारी अशी संयुक्त टीम या संदर्भामध्ये तातडीने हरकतींची सुनावणी घेणार आहे. येत्या पाच जुलै रोजी प्रभाग निहाय मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार असून नऊ जुलै रोजी प्रभाग निहाय मतदार यादी प्रसिद्ध होणार असून त्यामध्ये प्रभाग निहाय मतदान केंद्रांचा ही समावेश आहे अशी माहिती मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिली आहे.


Back to top button
Don`t copy text!