कोरोना संसर्गाची तालुक्याची त्रिशतकाकडे मार्गक्रमण: वाठार किरोली व कुमठे ठरले हॉटस्पॉट
स्थैर्य, पिंपोडे बुद्रुक,दि.५ (रणजित लेंभे) : दिवसेंदिवस जिल्हयात कोरोनासंसर्गचा विळखा वाढत चालला आहे. कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली आणि कुमठे ही गांव हॉट स्पॉट ठरली आहेत.संसर्ग सुरु झाल्यापासून व त्रिशतकीकडे वाटचाल करणाऱ्या तालुक्यात आत्ता पर्यंत एकूण २८७ रुग्ण बाधित सापडले आहेत. जिल्हयातील इतर तालुक्याच्या तुलनेने कोरेगाव तालुक्यातील प्रशासनाला कोरोना संसर्ग आटोक्यात ठेवण्यात बऱ्यापैकी यश आले आहे.मात्र सध्याच्या काही दिवसामध्ये समुह संक्रमणाचा प्रभाव वाढताना दिसत आहे. कोरोना विषयी काळजी घेण्याच्या अनुषंगाने अतिशय सावधान आणि अतिशय बिनधास्त लोक एकमेकांना वेडे ठरवताना नाहक वर्दळीच्या ठिकाणी गर्दी करतांना दिसत आहेत. पुढील काही काळामध्ये संसर्गाचा संक्रमण होऊ नये या करिता लोकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
जिल्हयात कोरोना संसर्ग कराड तालुक्यापासून सुरू झाला, त्यावेळी कोरेगाव तालुक्यात पहिला रुग्ण सोनके येथे आढळून आला.तेव्हा पासून आज पर्यंत या चार महिन्यात २८७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये चोरगेवाडी-२, पवारवाडी-५,अनपटवाडी-४,बनवडी-५, भांडवडी-२, बर्गेवाडी-१,भाडळे-६, भीमनगर-१, बोरगांव-१, बोरीव-१, चंचळी-३, चिमणगांव-३, चौधरवाडी-१, दरे-१, देऊर-१२, दुर्गवाडी-१, एकसळ-५ ,घिगेवाडी-६,होलेवाडी-१, जाब,-२,करंजखोप-४, कठापुर-४, खडखडवाडी-१,किरोली-१,खोलवडी-१,कोरेगाव -१६, कुमठे-४०, ल्हासुर्णे-५, नागझरी-५, नायगांव-५, न्हावी बुद्रुक-१, निगडी-३, पळशी-१,परतबड़ी-१, पिंपोडे बुद्रुक-५, आर एच कोरेगाव-१, रहिमतपुर-२, साप -३ सासुर्बे-२, शिरबें-७, सोनके-१, सुर्ली-१, झाझुंर्णे तडवळे-१०, तारगांव-३, त्रिपुटी-१, वेळू-१, वाघोली-१२, वाठार स्टेशन-७, वाठार किरोली-७०
तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र वाठार किरोली- ८७, तडवळे-८०, वाठारस्टेशन-४७, रहिमतपुर-२५, किन्हई-१५, पळशी-२५, सातारारोड-५ या सात विभागवार प्राथमिक आरोग्य केंद्रातून आज अखेर एकूण २८७ रुग्ण झाले आहेत. यापैकी १९९ जण बरे झाले आहेत.तर ७८ उपचार घेत आहेत. आत्ता पर्यंत दहा जणांचा मृत्यु झाला आहे. चेलेंज अकेडमी कोरेगाव, ब्रम्हपुरी, आणि कोरेगाव आरोग्य रुग्णालय या ठिकाणी रुग्णांना सेवा दिली जात आहे.
लोकांना कोरोना संसर्ग विषयी बरीच माहिती झाली आहे.त्यामुळे उपाययोजनांवर भर दिला पाहिजे. विशेषतः साठ वर्षाच्या वरील व इतर आजार असणाऱ्या व्यक्ती व लहान मुलांच्याबाबत अधिक काळजी घेतली पाहिजे. शरीरातील तापमान व ऑक्सिजन तपासणाऱ्या थर्ममिटरचा उपयोग कुटुंबासाठी केला पाहिजे. तसेच आरोग्य सेविका आणि आशानां कोविडच्या स्वतः रुग्ण व नातेवाईकांनी सविस्तर माहिती दिली तर योग्य वेळी उपचार होऊ शकतात. जास्तीत लोकांनी स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव यांनी दिली.
आरोग्य विभागाबरोबर प्रांताधिकारी किर्ती नलवडे आणि तहसीलदार रोहिणी शिंदे,प्रत्येक पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी, गटविकास अधिकारी सह तालुक्यातील प्रत्येक विभागात जाऊन प्रशासनाच्या माध्यमातून कोव्हीड या विषयी प्रबोधन आणि उपाययोजना करण्यासाठी खबरदारी घेत महत्वाची भूमिका बजावत आहेत. विभागातील पोलीस स्टेशनचे कर्मचारी, आरोग्यसेविका,आशासेविका आणि प्रशासन कोव्हीड रुग्ण सापडेल त्या परिसरात,कंटेन्टम झोनमध्ये योग्यती खबरदारी कार्यरत आहेत.
पिंपोडे जिल्हा परिषद गटाचे सदस्य सातारा जिल्हा परिषदेचे कृषी सभापती हे सुध्दा परिसरातील ज्या गावांत कोव्हिड रुग्ण आढळत आहे त्या गावात स्वतः जाऊन ग्रामस्थांना आधार देऊन,कोव्हिड याबाबत प्राथमिक काळजी घेण्यासंदर्भात सूचना व माहिती देऊन प्रशासकीय पातळीवर अडअडचणी सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने मदत व प्रयत्न करत आहेत.