नगरपालिका निवडणूकीसाठी दोन हजार 700 पोलिसांचा फौजफाटा

दोन दिवस वॉच राहणार : एसआरपीएफ, प्लाटूनही तैनात


स्थैर्य, सातारा, दि. 1 डिसेंबर :सातारा नगरपालिका जिल्ह्यातील निवडणुकीसाठी पोलिस अलर्ट झाले आहेत. उद्या व परवा या दोन दिवसांसाठी तब्बल 2700 पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला असून त्यांचा चोख बंदोबस्त राहणार आहे. मतदान व मतमोजणी साठी पोलिसांचा वॉच सुरु झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात एसआरपीएफ व प्लाटूनच्या तुकड्याही जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत.सातारा जिल्ह्यात 7 नगरपालिका आणि एका नगरपंचातीसाठी मंगळवारी मतदान व बुधवारी मतमोजणी होणार आहे. महाबळेश्वर व फलटणची निवडणूक स्थगित झाल्याने या दोन्ही ठिकाणचा बंदोबस्त इतर ठिकाणी वळवला जाणार आहे. पोलिसांची अधिक कुमक मिळणार असल्याने पोलिसांवरील ताण कमी होण्यास मदत मिळणार आहे. पोलिस बंदोबस्ताच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड बूथवर तैनात राहणार आहेत.

गेली 25 दिवस झाले सातारा जिल्ह्यात आचारसंहिता लागली असून तेव्हापासून सातारा पोलिस दलाची भिरकीट सुरु आहे. उद्या मतदान व परवा मतमोजणी होत याशिवाय एसआरपीएफ व प्लाटूनही सातारा, कराड येथे बंदोबस्तासाठी असल्याने पोलिस बंदोबस्तासाठी रवाना झाले आहेत. सातारा, कराडसह सर्वत्र हॉट परिस्थिती असून कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर येवू नये, यासाठी बाहेरुनही पोलिस बंदोबस्त जिल्ह्यात आला आहे. गेली दोन दिवस पोलिस बंदोबस्त आला असून रविवारपासून पोलिस त्या त्या ठिकाणी रवाना झाले आहेत.

सातार्‍यासह राज्यात सर्वत्र नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत. मतदान झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी मतमोजणी आहे. यामुळे मतदानासाठी जो पोलिस बंदोबस्त राहणार आहे. तोच पोलिस बंदोबस्त मतमोजणीसाठी पुढे राहणार आहे. यामुळे सलग दोन दिवस पोलिसांना बंदोबस्त करावा लागणार आहे. यामुळे सर्वच पोलिसांसह प्रामुख्याने महिला पोलिसांची दमछाक होणार आहे.


Back to top button
Don`t copy text!