
दैनिक स्थैर्य | दि. १५ मार्च २०२३ | फलटण |
फलटण तालुक्यातील रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था असल्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून फलटण तालुक्यातील रस्त्यांसाठी अर्थसंकल्पामध्ये विविध योजनांच्या माध्यमातून ३०/५४, २५/१५ नागरी सुविधा, जन सुविधा ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र ५०/५४ या योजनेमधून खालील गावांना निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये १) फलटण शिंगणापूर म्हसवड शेनवडी ते शिंगणापूर घाट संरक्षण भिंत व रस्ता सुधारणा करणे – ४ कोटी २) गिरवी नाकाते विंचुर्णी – २.५० कोटी ३) ताथवडा ते मानेवाडी फाटा – ४ कोटी ४) दर्याची वाडी ते बोडकेवाडी रस्ता सुधारणा करणे – ४ कोटी ५) तरडफ सपकाळ वस्ती ते उपळवे – ३ कोटी ६) गिरवी ते मांडवखडक – २.५० कोटी ७) विडणी गावाजवळ कॅनल वर नवीन फुलाचे बांधकाम करणे – ५ कोटी, असे एकूण २५ कोटींची कामे मंजूर झाली आहेत. तसेच ३०/५४ या योजनेअंतर्गत १२२.१२ लक्ष, ५०/५४ या योजनेंतर्गत १ कोटी, जनसुविधा अंतर्गत ८७ लाख, नागरी सुविधा ४५ लाख, ‘क’ वर्ग तिर्थक्षेत्र योजनेस २५ लाख, साकवसाठी ४० लाख, अशी २९.५० कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्यामुळे या तालुक्यातील दळणवळण सुलभ होण्यास मदत होईल.
तालुक्यातील कोणतही गाव आता डांबरीकरणाविना राहणार नाही. तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी आवश्यक ती मदत तालुक्यातील जनतेला करणार आहे, असे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले आहे.