दैनिक स्थैर्य । दि. ०१ ऑक्टोबर २०२१ । लोणंद । लोणंद येथील एचआर कॉम्पीट्रॉनिक्स दुकानातून दोन अनोळखी चोरट्यांनी मोबाईल व रोख रक्कम असा एकुण 23,000 रूपयाचा माल चोरून नेला.
याबाबत लोणंद पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, हर्षद भुजबळ यांचे लोणंद येथील लोणंद ते खंडाळा रोडलगत नवी पेठ मधील एचआर कॉम्पीट्रॉनिक्स दुकान आहे. दि. 25 रोजी दुपारी दोन अनोळखी इसम दुकानात आले होते त्यापैकी एकाने दुकानातील मुलांना बोलण्यात गुंतवून एक पांढरे रंगाचा शर्ट पॅन्ट घातलेल्या तोंडाला मास्क लावलेल्या अंदाजे 25 ते 35 वर्षे वयाच्या पुरुष व एक फुल बाह्याचा राखाडी रंगाचा शर्ट पॅन्ट घातलेला व तोडास मास्क लावलेला सुमारे 30 ते 40 वयोगटातील पुरुष या अनोळखी दोघांनी हातचलाखीने 21 हजार रूपयाचा मोबाईल व काउंटरवरील 2000 रुपये असा 23,000 रूपयाचा माल लबाडीने चोरुन नेहताना सीसीटिव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहेत. याबाबतची फिर्याद हर्षद भुजबळ यांनी लोणंद पोलिसांना दिली असुन पुढील तपास सपोनि विशाल वायकर करीत आहेत.