स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

उत्तर सोलापूर तालुक्यातील 23 गावांचे होणार ड्रोनद्वारे भूमापन, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख हेमंत सानप यांची माहिती

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
March 4, 2021
in प्रादेशिक

स्थैर्य, सोलापूर, दि. ०४ : गावठाणातील जमिनींचे ड्रोनद्वारे भूमापन (मोजणी) करण्यास सर्व्हे ऑफ इंडिया यांच्यातर्फे मान्यता मिळाली आहे. जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील 23 गावांच्या गावठाणांचे 5 मार्च 2021 पासून ड्रोनद्वारे भूमापन होणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख हेमंत सानप यांनी दिली.

ड्रोनद्वारे गावठाणांचे भूमापन हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून याचा ग्रामस्थांना फायदा होणार आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी, नंदूर, बेलाटी, तेलगाव, तरटगाव, भोगाव, शिवणी, भागाईचीवाडी, दारफळ गावडी, बाणेगाव, खेड, एकरूख, इंचगाव, गुळवंची, पडसाळी, वांगी, साखरेवाडी, तळेहिप्परगा, हगलूर, समशापूर, होनसळ, राळेरास आणि सेवालालनगर याठिकाणी 5 मार्चपासून जमिनींचे मोजमाप होणार आहे.

सर्व ग्रामस्थांनी आपल्या मिळकतीचे सीमांकन ग्रामसेवक, भूकरमापकाच्या सहाय्याने चुना पावडरने वेळेवर करून घ्यावे. सार्वजनिक मिळकती, शासन मिळकती विशेषत: रस्त्याच्या हद्दीचे संरक्षण होण्यासाठी ग्रामविकास अधिकारी, भूमी अभिलेख अधिकारी/कर्मचारी यांना योग्य माहिती पुरवावी, असे आवाहन  श्री. सानप यांनी केले आहे.

ग्रामस्थांनी करावयाची कामे

  • ग्रामसभेत उपस्थित राहून गावठाण भूमापनाचे महत्व, फायदे आणि कार्यपद्धती जाणून घ्यावी.
  • ग्रामपंचायतीच्या अभिलेखामध्ये स्वत:च्या मिळकतीसंबंधी वारस नोंदी, इतर कायदेशीर हस्तांतरणाच्या नोंदी अद्ययावत करून घ्याव्यात.ग्रामसेवकाला भ्रमणध्वनी आणि पत्ते द्यावेत.
  • शेजारी, नातेवाईक, मित्र गावात राहत नसतील तर त्यांना भूमापनाची माहिती द्यावी. त्यांचेही फोन आणि पत्ते असल्यास उपलब्ध करून द्यावेत.
  • ड्रोनद्वारे भूमापनाच्या कामाला प्रारंभ करण्यापूर्वी सीमांकन करावे, सीमांकनाबाबत वाद असल्यास आपल्या हद्दी सीमांकित करून घेऊन ग्रामसेवक, भूकरमापक किंवा भूमापन अधिकारी यांच्या  निदर्शनाला आणून द्यावी.
  • सार्वजनिक, शासकीय, ग्रामपंचायतीच्या मालमत्तावर कोणी हक्क सांगत असतील तर त्याची  माहिती द्यावी.
  • मालकी हक्काच्या चौकशीवेळी चौकशी अधिकाऱ्यासमोर पुराव्याची कागदपत्रे सादर करावीत.
  • दिवाणी न्यायालये, प्राधीकरण, न्यायाधीशासमोरील दावे, अर्ज, अपिल याची माहिती द्यावी.

ग्रामस्थांना होणारे फायदे

  • शासनाच्या मालकीच्या मिळकतींचे संरक्षण होईल.
  • गावातील घरे, रस्ते, शासनाच्या/ग्रामपंचायतीच्या खुल्या जागा, नाले यांच्या सीमा आणि क्षेत्र निश्चित होण्यास मदत होर्ईल.
  • मिळकतीचा नकाशा तयार होईल.
  • कायदेशीर हक्काचा अधिकारी अभिलेख मिळकत पत्रिका (प्रापर्टी कार्ड) स्वरूपात तयार होईल.
  • ग्रामस्थांच्या नागरी हक्काचे संवर्धन होईल.
  • मिळकत पत्रिका तयार झाल्यामुळे घरावर कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध होईल.
  • मिळकतींना बाजारपेठेमध्ये तरलता येऊन गावांची आर्थिक पत उंचावेल.
  • गावठाण भूमापनाची कार्यपद्धती पारदर्शकपणे राबविली जाणार असून ग्रामस्थांना अभिलेख सहज उपलब्ध होतील.
  • प्रशासकीय नियोजनासाठी गावठाण भूमापन नकाशे उपलब्ध होतील.
  • ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचे स्त्रोत निश्चित होतील.

📣 दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. दैनिक स्थैर्यच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करावे.

ADVERTISEMENT
Previous Post

सातारा प्रांत, तहसिल कार्यालयाची सुसज्ज इमारत नवीन जागेत, आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीवरून अजितदादांच्या महसूल, वित्त विभागाला सूचना

Next Post

महिला दिनानिमित्त ट्रेलचा ‘सुपरस्त्री’ उपक्रम

Next Post

महिला दिनानिमित्त ट्रेलचा 'सुपरस्त्री' उपक्रम

ताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा

Join 1,033 other subscribers

जाहिराती

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील अंत्योदय, प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना मोफत धान्य जिल्हाधिकारी शंभरकर यांची माहिती

April 22, 2021

५४% भारतीय विद्यार्थी म्हणतात ऑनलाइन शिक्षणाचे मॉडेल सोयीस्कर : ब्रेनली

April 22, 2021

पालकमंत्र्यांची मालखेड येथील रोपवाटिकेला भेट; रोजगार हमी योजनेच्या कामाची केली पाहणी

April 22, 2021

ऑक्सिजन गळती प्रकरणाचा तपास करणार विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समिती

April 22, 2021

शेतकऱ्यांच्या सहाय्यासाठी शाश्वत सिंचन सुविधा उभारणार – जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू

April 22, 2021
परळी ता. सातारा येथे कोरोना मदत केंद्राचे उदघाटन करताना आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले. शेजारी राजू भोसले, सौ. सरिता इंदलकर, अरविंद जाधव, सौ. विद्या देवरे व इतर मान्यवर

कोरोनाला आळा घालण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज – आ. शिवेंद्रसिंहराजे

April 22, 2021

फलटण तालुक्यातील २९३ तर सातारा जिल्ह्यातील १८१५ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; २८ बाधितांचा मृत्यु

April 22, 2021

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने सातारचे जिल्हादंडाधिकारी यांचे सुधारित आदेश जारी

April 22, 2021

फलटणमध्ये विद्युत स्मशानभूमी करा; नगरसेवक अशोकराव जाधव यांची मागणी

April 22, 2021

गरजू रुग्णास तात्काळ बेड उपलब्ध करुन द्या – पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम

April 22, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

कॉपी करू नका.