दैनिक स्थैर्य । दि.०१ फेब्रुवारी २०२२ । सातारा । आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे एकहाती वर्चस्व असलेल्या सातारा पंचायत समितीने सातारा तालुक्यातील १९१ ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगातून तब्ब्ल २२ कोटी १५ लाख १० हजार २४६ रुपये निधी उपलब्ध केला आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या सूचनेनुसार तालुक्यातील प्रत्येक गावातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून संबंधित ग्रामपंचायतींनी पंचायत समितीकडे संपर्क साधावा, असे आवाहन सभापती सौ. सरिता इंदलकर आणि उपसभापती अरविंद जाधव यांनी केले आहे.
सातारा तालुक्यातील आगुंडेवाडी, आकले, आलवडी- धावली, आंबळे रायघर, आंबवडे बु., आंबवडेखु., आंबेवाडी, अंगापूर तर्फ तारगाव, अंगापूर-वंदन, अपशिंगे, आरळे, आरे तर्फ परळी, आरगडवाडी, आरफळ, आष्टे, आसनगाव, आसगाव, अटाळी -सावली, अतीत, आवाडवाडी, बसाप्पाचीवाडी, बेंडवाडी, भैरवगड, भरतगाव, भरतगाववाडी, भाटमरळी, भोंदवडे, बोपोशी, बोरगाव, बोरखळ, बोर्णे, चाळकेवाडी, चिखली, चिंचणेर, चिंचणेर निंब, चिंचणी, चिंचनी (रेह), चिंचणेर वंदन, चोरगेवाडी, डबेवाडी, दरे तर्फ परळी, देगाव, देवकल पारंबे, देशमुख नगर, धनगरवाडी (कोडोली), धनगरवाडी (निगडी), धनावडेवाडी, धावडशी, धोंडेवाडी, डोळेगाव, फत्त्यापूर, गजवडी, गणेशवाडी, गवडी, गोगावलेवाडी, गोजेगाव, गोवे, हमदाबाज, इंगळेवाडी, जाधववाडी, जैतापूर, जकातवाडी, जांभळेवाडी क्र. १, जांभे, जांभळगाव, जावळवाडी, जिहे, जोतिबाचीवाडी, कळंबे, काळोशी, कामठी, कामेरी, कन्हेर, करंदी, कारंडवाडी, करंजे त.परळी, कारी, काशिळ, केळवली-सांडवली, खडगाव, खावली, खेड, खिंडवाडी, खोडद, खोजेवाडी, किडगाव, कोडोली, कोंडणी नरेवाडी, कोंडवे, कोंढवली, कोपर्डे, क्षेत्र माहुली, कुमठे, कुरळबाजी, कुरुण, कुस -बु., कुसावडे, कुशी, लांडेवाडी, लावंघर, लिंब, लिंबाचीवाडी, महागाव, माजगाव, मालगाव, माळ्याची वाडी, मांडवे, मापरवाडी, मर्ढे, मस्करवाडी, मत्त्यापूर, म्हसवे, मोरेवाडी, नागेवाडी, नागठाणे, नांदगाव, नेले, न्हाळेवाडी, निगडी त.सातारा, निगडी वंदन, निगुडमाळ, निनाम, निसराळे, नुने, पाडळी, पळसावडे, पांगारे, पानमळेवाडी, परळी, परमाळे, पाटेघर, पाटेश्वरनगर, पाटखळ, पेट्री-अनावळे, फडतरवाडी, पिलानी, पिलानीवाडी, पिंपळवाडी, पोगरवाडी, राजापुरी, राकुसलेवाडी, रामकृष्णनगर, रामनगर, रेनावळे, रेवंडे, रोहोट, साबळेवाडी, सैदापूर, समर्थगाव, समर्थनगर, सांबरवाडी, संभाजीनगर, संगम-माहुली, सारखळ, सासपडे, सायळी, सायळी (रेह), शहापूर, शेळकेवाडी, शेंद्रे, शेरेवाडी, शिंदेवाडी, शिवाजीनगर, शिवथर, सोनापूर, सोनवडी, सोनेगाव त. सातारा, सोनगाव-एस-निंब, तासगाव, ठोसेघर, टिटवेवाडी, तुकाईवाडी, उपळी, वडूथ, वळसे, वनगळ, वर्णे, वर्ये, वासोळे, वेचले, वेळे, वेनेगाव, वेणेखोल, विजयनगर, वडगाव, वाढे, वावदरे, यादववाडी, यतेश्वर, झरेवाडी आदी गावांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
संबंधित ग्रामपंचायतींनी ठराव करून पंचायत समिती कार्यालयात तातडीने संपर्क साधावा आणि उपलब्ध झालेल्या निधीतून गावातील विकासकामे मार्गी लावावीत, असे आवाहन सौ. इंदलकर आणि जाधव यांनी म्हटले आहे.