स्थैर्य, फलटण, दि. २७ : मुंबई येथून सस्तेवाडी येथे आलेल्या दाम्पत्यांच्या कुटुंबातील २१ वर्षीय मुलीच्या स्त्रावाचा रिपोर्ट पाॅसिटीव्ह आला आहे. मुंबई येथून सस्तेवाडी येथे आलेल्या दाम्पत्याचा रिपोर्ट या पूर्वीच पॉसिटीव्ह आला आहे त्याच कुटुंबातील सदरील मुलीला करोनाची लागण झाली असून कोळकी येथील अक्षतनगर व सस्तेवाडी येथील उर्वरीत सर्व हाय रिस्क संपर्क व्यक्तींच्या चाचण्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले असल्याची माहिती फलटण उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी दिली.
करोना म्हणजेच कोव्हीड 19 बाबत अधिक माहिती देताना उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजी जगताप म्हणाले की, कोळकी येथील अक्षतनगर मधील १ व सस्तेवाडी मधील २ स्वॅब तपासणी साठी रिजेक्ट झालेले असून आवश्यकता असल्यास वरीष्ठ कार्यालयास संपर्क करुन त्यांची तपासणी पुन्हा केली जाईल. त्या सोबतच मुंबईवरून आलेली व I.L.I. लक्षणे दिसत असल्याने खुंटे येथील मुलीची घेतलेली चाचणीही निगेटीव्ह आली असल्याचेही डॉ. शिवाजी जगताप यांनी स्पष्ट केले.