21 हजार सातारकरांनी पुसला असाक्षरतेचा कलंक

राजेश क्षीरसागर; ’उल्लास’ साक्षरतेत कोल्हापूर विभागात लक्ष्यभेद


दैनिक स्थैर्य । 30 जुलै 2025 । सातारा । नव भारत साक्षरता कार्यक्रमात कोल्हापूर शैक्षणिक विभागाने असाक्षर नोंदणी आणि साक्षरता परीक्षेत लक्ष्यभेदी कामगिरी केली आहे.

राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्थेने (एनआयओएस) 23 मार्च 2025 रोजी घेतलेल्या उल्लास परीक्षेचा महाराष्ट्र राज्याचा निकाल 10 जुलै रोजी नुकताच जाहीर केला आहे. या परीक्षेत राज्याचा निकाल 98.75 टक्के लागला आहे. यात कोल्हापूर विभागाचा निकाल 99.63 टक्के लागला आहे. सातारा जिल्ह्याचा निकाल 99.36 टक्के लागला आहे. दहावी बारावी बोर्ड परीक्षा, पाचवी आठवी शिष्यवृत्ती, एनएमएमएस शिष्यवृत्ती, राष्ट्रीय संपादनूक सव्र्व्हे, आधार नोंदणी व पडताळणी, अपार नोंदणी, यासह शिक्षण पीजीआय विभागातील बहुतांश मापदंडात कोल्हापूर विभाग राज्यात पुढे आहे.

मागील दोन वर्षात कोल्हापूर विभाग उल्लासमध्ये पिछाडीवर होता. पाठपुराव्यामुळे विभागाने उल्लासमधील असाक्षर नोंदणीचे, परीक्षेस बसविण्याचे उद्दिष्ट ओलांडले आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी (योजना) यांची तर तालुकास्तरावर तहसीलदार, अधिकारी, गटविकास गटशिक्षणाधिकारी यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत आहे. योजना18.802 तसेच सुधारणा आवश्यक शेरा प्राप्त असलेले आणि चालू वर्षी देण्यात आलेले नोंदणीचे उदिष्ट असे मिजून 74,827असाक्षरांना परीक्षेस बसवण्याचे उदिष्ट होते. विभागात प्रत्यक्ष 84,218 इतकी नोंदणी झाली. परीक्षेस 83.529 बसले. त्यापैकी 83 हजार 224 उतीर्ण झाले. केवळ 305 असाक्षरांना सुधारणा आवश्यक शेरा मिळाला आहे.

शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील यांनी निकालाबाबतचे प्रसिद्धीपत्रक जाहीर केले असून सातारा जिल्ह्यास 16,255 नोंदणीचे व 18,050 परीक्षेस बसवण्याचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात नोंदणी 22,451 इतकी झाली. तर परीक्षेस 21,720 इतके बसले. त्यापैकी 21,582इतके उत्तीर्ण झाले. केवळ 138 असाक्षरांना सुधारणा आवश्यक असा शेरा प्राप्त झाला आहे. उत्तीर्ण झालेल्या नवसाक्षरांचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, योजना शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी अभिनंदन केले आहे.

राज्य योजना कार्यालयाच्याउल्लास योजनेने आता सर्वत्र गती घेतली आहे. अद्यापही मोठा पल्ला गाठायचा आहे. नवसाक्षरांचे निरंतर शिक्षण सुरु राहण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.
– राजेश क्षीरसागर, विभागीय समन्वयक, उल्लास
, तथा विभागीय अध्यक्ष कोल्हापूर व कोकण मंडळ.


Back to top button
Don`t copy text!