राष्ट्रीय महामार्ग टोल प्लाझाच्या 20 कि. मी. परिसरातील वाहनांसाठी मासिक पास रू.285


दैनिक स्थैर्य । दि. १८ डिसेंबर २०२१ । सातारा । पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील सातारा जिल्ह्यातील टोल प्लाझाच्या 20 कि.मी.परिसरात मासिक पासाचा सध्याचा दर रू. 285 असल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिली.

ज्या व्यक्तीकडे गैर व्यावसायिक (Non Commercial) कारणासाठी नोंदणीकृत यांत्रिक (Mechanical)वाहन आहे व ती व्यक्ती  टोल प्लाझाच्या 20 कि.मी. परिसरात राहते त्या व्यक्तींना भारतीय राष्ट्रीय महामार्ग (NHAI) व मे. पुणे सातारा टोल रोड प्रा. लि. (PSTRPL) यांच्यातील करारातील शेडयूल आर च्या कलम 8(3) नुसार रु. 150 (2007-2008 च्या मुळ दराने) चा मासिक पास उपलब्ध केला जात होता. प्रतिवर्षी मासिक पासच्या दरात सुधारणा करण्यात येत असते त्यानुसार मासिक पासाचा सध्याचा दर रु. 285 आहे.


Back to top button
Don`t copy text!