फलटण तालुक्यातील २ विद्यार्थिनी खेळाडूंचा भारतीय हॉकी संघात समावेश : आसू व कोळकी येथे आनंदोत्सव

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २५ मे २०२३ । आसू । भारतीय महिला हॉकी संघाची नुकतीच घोषणा झाली असून फलटण तालुक्यातील २ तरुणींची त्यामध्ये निवड झाली आहे. कु. वैष्णवी फाळके, आसू आणि कु. ऋतुजा पिसाळ, कोळकी या त्या २ गुणी विद्यार्थिनी  खेळाडू आहेत.

जपान मध्ये होणाऱ्या एफ. आय. एच. ज्युनिअर महिला हॉकी विश्वकप २०२३ एशिया कप साठी १८ महिला खेळाडूंचा भारतीय संघ जाहीर झाला आहे. या हॉकी संघात आसू  येथील कु. वैष्णवी फाळके आणि कोळकी येथील कु. ऋतुजा पिसाळ या दोघींचा समावेश आहे.

ज्युनिअर महिला हॉकी विश्वकप २०२३ एशिया कप स्पर्धा दि. २ ते ११ जून २०२३ दरम्यान जपान येथे होणार आहे. भारताचा ज्युनिअर महिला हॉकी संघ हॉकी इंडियाने जाहीर केला आहे. या संघात १८ खेळाडूंची निवड केली आहे. प्रिती कर्णधार व दीपिका  उपकर्णधारदार पदी निवड झाली आहे.

भारतीय ज्युनिअर महिला हॉकी संघात  माधुरी किंडो, आदिती माहेश्वरी, महिमा टेटे, प्रीती कप्तान, नीलम रोपनिकुमारी, अंजली बर्वा, तर मिड फिल्टर ऋतुजा पिसाळ, मंजू चौरासिया, ज्योती छत्री, वैष्णवी फाळके, सुजाता कुंजूर, मनीश्री शेडगे यांचा समावेश केला आहे.

ज्युनिअर महिला हॉकी संघातील ग्रुप A मध्ये भारत, मेनकोरिया, मलेशिया, चीन टाइपे व ऊजबेकीस्थान  या देशांचा समावेश आहे तर ग्रुप D मध्ये जपान, चीन, कजाकिस्तान, हॉंगकॉंग, चीन व इंडोनेशिया या देशांचा समावेश आहे.

भारतीय संघ दि. ३ जून रोजी उजबेकिस्तान बरोबर पहिला सामना खेळणार आहे. त्यानंतर दि. ५  जून रोजी मलेशिया बरोबर मॅच होणार आहे. दि. ६ जून रोजी कोरिया बरोबर मॅच खेळेल, टाईप चीन टाईपी बरोबर मॅच होईल दि. १० जून रोजी सेमी फायनल  तर दि. ११ जून रोजी फायनल मॅच होणार असल्याचे कळविण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!