दैनिक स्थैर्य | दि. २२ ऑक्टोबर २०२१ | सातारा | आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून सातारा आणि जावली तालुक्यातील ५२ विकासकामांना तब्ब्ल २ कोटी ४० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. ग्रामपंचायतींना जनसुविधेकरिता आणि नागरी सुविधेकरिता विशेष अनुदान या योजनेतून हा निधी मंजूर करण्यात आला आहे.
जावली तालुक्यातील २२ कामांसाठी १ कोटी १५ लाख निधी मंजूर झाला असून यामध्ये काटवली गावांतर्गत रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे, गाळदेव येथील अंतर्गत रस्ता, आखाडे येथील बौद्ध वस्ती ते करंदी फाटा खडीकरण, डांबरीकरण, करंदी तर्फ मेढा येथे में रॉड पासून गावांतर्गत रस्ते डांबरीकरण, पुनवडी येथे स्मशानभूमी रस्ता डांबरीकरण, सर्जापूर येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधणे, सोनगाव येथे स्मशानभूमी रस्ता व सुशोभीकरण करणे, गांजे येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधणे, भोगवली तर्फ मेढा येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधणे, करंडी तर्फ मेढा येथे स्मशानभूमी शेड बांधणे, वारोशी येथे स्मशानभूमी शेड बांधणे, कुसूंबी मुरा येथे स्मशानभूमी शेड बांधणे, केळघर येथे स्मशानभूमी सुशोभीकरण करणे, आंखेंगनी (बनवस्ती) मोरावळे मुरा रस्ता मातीकाम करणे, कावडी येथे स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता काँक्रीट करणे, हातगेघर येथे मारुती मंदिर ते काळेश्वरी मंदिर रस्ता काँक्रीट करणे, महामूलकरवाडी ग्रामपंचायत कार्यालय बांधणे, सालापणे येथे स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता करणे, जावळेवाडी येथे स्मशानभूमी बांधणे, कुडाळ येथील श्री समर्थ कॉलनी येथे गटर्स बांधणे व रस्ता डांबरीकरण करणे, कुडाळ येथील सावतामाळी मंदिर ते पानस रस्ता व गटर करणे, कुडाळ येथील पिंपळेश्वर कॉलनी येथील रस्ता करणे या कामाचा समावेश करण्यात आला आहे.
सातारा तालुक्यातील ३० विकासकांनसाठी १ कोटी २५ लाख रुपये निधी मंजूर झाला असून त्यामध्ये कण्हेर येथील अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे (प्रा. आरोग्य केंद्रासमोर), उपाली येथे स्मशानभूमी ते देवळापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे, शेंद्रे (भोसलेवाडी) येथे स्मशानभूमीला संरक्षक भिंत बांधणे, शेंद्रे हायवे ते ग्रामपंचायत कार्यालय रस्ता करणे, जकातवाडी येथील कुर्णेश्वर कॉलनी मधील रस्ता तयार करणे, सैदापूर येथील वनहर्त अपार्टमेंट ते निकी बन्ट्स रस्ता, कूस बु. येथील बोन्डारवाडी स्मशानभूमी रस्ता तयार करणे, जांभे येथे स्मशानभूमी शेड बांधणे, मानेवाडी (बोपोशी) स्मशानभूमी शेड बांधणे, कसबे लिंब येथील स्मशानभूमी सुशोभीकरण करणे, नागेवाडी ग्रामदैवत काळूबाई माता अंतर्गत रस्ता डांबरीकरण, कळंबे गावांतर्गत रस्ता डांबरीकरण, काँक्रीटीकरण, कण्हेर (जांभळामुरे ) येथे स्मशानभूमी शेड व सुशोभीकरण, इंगलेवाडी स्मशानभूमी रस्ता व सुशोभिकारण, आंबवडे बु. येथील रस्ता, आंबवडे खु. गावांतर्गत रस्ता, सोनवडी रस्ता काँक्रीटीकरण, डबेवाडी येथे स्मशानभूमी रस्ता काँक्रीटीकरण, वेळे येथे गावांतर्गत रस्ता करणे, आगुंडेवाडी येथे उत्तम भिकू आगुंडे ते अशोक चंद्रकांत आगुंडे यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण, चोरगेवाडी, माळवाडी येथे रस्ता काँक्रीटीकरण, इंगळेवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालय ते महालक्ष्मी मंदिर रस्ता काँक्रीटीकरण, कोंडवे येथे जुना रोड ते पांडुरंग सुतार जाणारा रस्ता करणे, कोंडवे येथे पांडुरंग सुतार घर ते स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता, राकुसलेवाडी अंतर्गत रस्ता, भरतगाव येथे शेलार वस्ती येथील स्मशानभूमी शेड बांधणे, शेरेवाडी येथे स्मशानभूमी शेड व रस्ता, आंबवडे बु. येथील स्मशानभूमी शेड बांधणे व सुशोभीकरण, आंबवडे बु. येथील पाण्याची टाकी ते पोलीस पाटील घरापर्यंत रस्ता करणे, नुने येथील स्मशानभूमी रस्ता डांबरीकरण करणे या कामांचा समावेश आहे.
तीन यात्रास्थळांसाठी १७ लाख
दरम्यान, आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या माध्यमातून क वर्ग यात्रास्थळ विकास कार्यक्रमांतर्गत सातारा तालुक्यातील लिंब येथील कोटेश्वर मंदिर परिसर सुशोभीकरण व वाहन तळ उभारणेसाठी ५ लाख, घाटाई देवी मंदिर येथे संरक्षक भिंत बांधण्यासाठी ५ लाख आणि जावली तालुक्यातील कुसूंबी येथील काळेश्वरी मंदिर सभा मंडप, संरक्षक भिंत व सुशोभीकरण करण्यासाठी ७ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
|