चौसिंगा’च्या शिकार प्रकरणी २ आरोपींना अटक; सातारा वन विभागाची कारवाई

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०७ डिसेंबर २०२१ । सातारा । कण्हेर विभागातील जांभळेवाडी येथे चौसिंगा जातीच्या वन्यप्राण्याची शिकार होत असल्याची गोपनीय माहीती मिळताच सातारा वनविभागाने छापा टाकुन दोन आरोपींना मुद्देमाला सोबत ताब्यात घेऊन त्यांना अटक केली आहे.

सातारा तालुक्यातील जांभळेवाडी(कण्हेर)येथे चौसिंगा या वन्यप्राण्याची शिकार केली जात असल्याची गुप्त माहिती वनविभागाला समजताच वनविभागाने कण्हेर जांभळेवाडी रोडवर धाव घेतली या मार्गावर MH ११ cH ७१९६ या मोटारसायकल वाहन चालकांच्या हलचाली संशस्पद आढळुन आला. त्यांच्यावर छापा टाकुन कसुन चौकशी करताच संशयित आरोपी नथू सखाराम करंजकर रा.जांभळेवाडी(कण्हेर) व राजकुमार मारुती इंदलकर रा.कळंबे या दोघांकडुन जखमी चौसिंगा ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यांना अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.वनसंरक्षक सुधीर सोनवले,वनपरिक्षेत्र अधिकारी निवृती चव्हाण,वनपरिमंडळ अधिकारी कुशल पावरा, वनरक्षक सुहास भोसले, राज मोसलगी, मारुती माने, वनमजूर गोरख शिरतोडे यांनी केली.


Back to top button
Don`t copy text!