
स्थैर्य, 4 जानेवारी, सातारा : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ऐतिहासिक कामगिरी करत सातारा जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच केंद्रीय रस्ते निधी मधून जिल्ह्याला तब्बल 218 कोटी रुपयांचा भरीव निधी नुकताच उपलब्ध करून दिला होता. आता सलग दुसर्यांदा ना. शिवेंद्रसिंहराजेंच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते निधीमधून जिल्ह्यासाठी 192 कोटी रुपयांचा ’बूस्टर’ मिळाला आहे. या निधीतून जिल्ह्यातील विविधप्रकारची रस्ते विकासकामे मार्गी लागणार आहेत. निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ना. शिवेंद्रसिंहराजेंनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ना. अजित पवार यांचे आभार मानले आहेत
पहिल्यांदाच मंत्री झालेल्या ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून जिल्ह्यातील सर्वच आमदार आणि खासदारांच्या कामांचा समावेश करून सर्व मतदारसंघांना न्याय देत केंद्रीय रस्ते निधीमधून नुकताच 218 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला होता. आता सलग दुसर्यांदा ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी केंद्रीय रस्ते निधीमधून जिल्ह्यासाठी भरीव निधी मिळवून अनोखा इतिहास घडवला आहे. अशी कामगिरी करणारे ना. शिवेंद्रसिंहराजे हे जिल्ह्यातील पहिलेच मंत्री ठरले असून याबद्दल जिल्हावासियांमधून समाधान व्यक्त होत आहे.
मंजूर निधीमध्ये पाटण तालुक्यातील पाटण- मणदुरे जवळ तारळे पाल काशीळ रस्त्याचे मजबुतीकरण करणे व पूल बांधणे (0/00 ते 45/00 किमी) यासाठी 30 कोटी, सातारा तालुक्यातील भोंडवडे, आंबवडे बु., सायळी, वडगाव, सावली, कुरुळबाजी, कुडेघर, रोहोट, पाटेघर, आलवडी, धावली या रस्त्यावर पोहोच रस्त्यासह पुलाचे बांधकाम करणे 7 कोटी, एनएच 4 ते म्हसवे, करंजे, ते मोळाचा ओढा, शाहूपुरी पोलीस ठाणे, मतकर कॉलनी, शाहूपुरी चौक, जुना मेधा रोड ते सारखळ (भाग मोळाचा ओढा ते शाहूपुरी चौक) रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे 24 कोटी, घाटाई देवी फाटा, कास पठार, कास तलाव, कास तलाव भिंत 0/00 ते 4/200 किमी या रस्त्याच्या कामासाठी 10 कोटी, रामा 140 ते कण्हेर, वेळे, कुसूंबी, मोहोट, म्हाते खु., वागदरे, ते मानेवाडी, भाग चोरगेवाडी ते कामथी तर्फ सातारा या रस्त्याची सुधारणा व वायंडिंग करणेसाठी 11 कोटी, एनएच 4 ते काशीळ कोपर्डे नलवडेवाडी येथे उरमोडी व कृष्णा नदीवरील मोठ्या पुलाचे बांधकाम जाण्यासाठी 20 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे.
जावली तालुक्यात एनएच 4 ते आनेवाडी, सायगाव, मोरघर, वाघेश्वर, भाग आनेवाडी ते वाघेश्वर 0/00 ते 14/00 या रस्त्याची सुधारणा व वायंडिंग करणेसाठी 30 कोटी, गोगवे वरसोली, गाळदेव, वागदरे, म्हाते, मोहोट, गांजे, तांबी, खरोशी, निझरे, कामथी. वेळे, कण्हेर रस्ता भाग कुसूंबी ते वेळे 6/400 ते 20/00 किमी या रस्त्याची सुधारणा व वायंडिंग करणे 25 कोटी, सातारा, कास, बामणोली, गोगवे, तापोळा, महाबळेश्वर रस्ता भाग कास तलाव ते अंधारी फाटा 30/490 ते 34/820 किमी या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी 5 कोटी निधी मंजूर झाला आहे.
माण तालुक्यातील वाकी ते वरकुटे म्हसवड रस्त्यावर वाकी गावाजवळ माणगंगा नदीवर पुलाचे बांधकाम करणे 8 कोटी, खटाव तालुक्यात कलेढोण जिल्हा हद्द ते वाजेगाव (सांगली) 0/00 ते 3/200 किमी या रस्त्याची सुधारणा करणेसाठी 2 कोटी, कराड तालुक्यातील इंदोली चोरे पाल रस्ता 11/00 ते 22/500 किमी रस्त्याची सुधारणा करण्यासाठी 20 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. मंजूर कामांची निविदा प्रक्रिया व इतर शासकीय सोपस्कार तातडीने पूर्ण करून कामे तातडीने सुरु करा तसेच कामे दर्जेदार करून वेळेत पूर्ण क्रम अशा सूचना ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संबंधित अधिकार्यांना केल्या आहेत.

