
स्थैर्य, सातारा दि. 4 : कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणारे 5,पार्ले ता. कराड येथील कोरोना केअर सेंटर येथे दाखल असणारे 3, खावली ता. सातारा येथील कोरोना केअर सेंटर येथे दाखल असणारे 5 आणि रायगाव ता. जावली येथील कोरोना केअर सेंटरमधील 6 असे एकूण 19 नागरिक आज कोरोनातून पूर्णपणे बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले.
कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणारे वानरवाडी येथील 1 पुरुष व 1 महिला, उंब्रज येथील 1 महिला, पाटण तालुक्यातील सदुवरपेवाडी येथील 1 महिला, नवारस्ता येथील 1 मुलगी. पार्ले कोरोना केअर सेंटर, कराड येथील दाखल असणारे जावली तालुक्यातील सावरी येथील 2 महिला व 1 पुरुष. खावली ता. सातारा कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल असणारे वाई तालुक्यातील आसरे येथील 1 महिला, कोरेगाव तालुक्यातील वेळू येथील 1 पुरुष, रायघर ता. सातारा येथील 1 महिला, शेळकेवाडी ता. सातारा येथील 1 पुरुष, सावरी ता. जावली येथील 1 महिला. रायगाव कोरोना केअर सेंटर येथे दाखल असणारे जावली तालुक्यातील सायगाव येथील 1 पुरुष, केळघर येथील 2 महिला व 2 पुरुष, मोरघर येथील 1 महिला यांचा समावेश आहे.