स्थैर्य, सातारा, दि.६: भारतात दैनंदिन चाचण्यांमध्ये अद्वितीय वाढ झाली असून सलग दोन दिवस प्रतिदिन 11.70 लाख चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशभरात एकूण 4.77 कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत. सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 1647 चाचणी प्रयोगशाळा कार्यरत आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने अद्ययावत चाचणी नियमावली जारी केली आहे.
नवीन नियमावलीने चाचणी प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे आणि लोकांना अधिक चाचणीची सुविधा उपलब्ध करण्यासाठी राज्य पातळीवरील अधिकार्यांना अधिक स्वातंत्र्य आणि लवचिकता प्रदान केली आहे.
प्रथमच, अधिक सुलभ केलेल्या पद्धतींबरोबरच, अद्ययावत नियमावलीत अधिक चाचण्यांची खात्री करण्यासाठी मागणी करताच ‘ऑन-डिमांड’ चाचणीची तरतूद आहे.
नियमावलीत चाचण्यांची निवड (प्राधान्याने)करण्याविषयी तपशीलवार माहिती दिली आहे, यात:
i) प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये नियमित देखरेख आणि प्रवेश ठिकाणांवर चाचणी
ii) प्रतिबंधित नसलेल्या क्षेत्रांमध्येही नियमित देखरेख आणि
iii) रुग्णालय व्यवस्था
iv) मागणी करताच चाचणी
मागणी करताच चाचणी (टेस्टींग ऑन डिमांड) हा भाग पूर्णतः नवीन आहे, ज्यात नोंदणीकृत डॉक्टरांकडून मेडिकल प्रिस्क्रीपशन शिवाय चाचणी ही पूर्णपणे व्यावाहरिक उद्देशासाठी जोडण्यात आली आहे, यावर राज्य सरकारांना आणखी सुलभ प्रक्रियेविषयी निर्णय घेण्याचा अधिकार आहे. नव्या नियमावलीनुसार, देशाबाहेर/राज्यांमध्ये प्रवासासाठी प्रवेशठिकाणांवर नकारात्मक कोविड-19 चाचणी असलेले आणि ज्यांची चाचणी करण्याची इच्छा आहे, त्या सर्वांची चाचणी करण्यात येईल.
मागोवा आणि संपर्क मागोवा यंत्रणा सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांना सूचित करुन चाचणी प्रयोगशाळांच्या माध्यमातून सुनिश्चित करण्यात यावी.
चाचण्यांची वारंवारिता:
- एका वेळी केलेली आरटी-पीसीआर/ट्रूनॅट/सीबीएनएएटी/आरएटी पॉझिटीव्ह चाचणी ही निश्चित मानावी, पुन्हा चाचणीची आवश्यकता नाही.
- · बरे झाल्यानंतर रुग्णालयातून जाताना फेर-चाचणीची शिफारस केली जाणार नाही, कोविड क्षेत्र/सुविधा केंद्रातून गैर कोविड क्षेत्र/सुविधा क्षेत्रात जाता येणार नाही.
- · जर आरएटी निगेटीव्ह चाचणीनंतर लक्षणे दिसून आली तर पुन्हा आरएटी किंवा आरटी-पीसीआर चाचणी करावी.
लक्षात घ्यावयाचे मुद्दे:
- डब्ल्युएचओ रुग्ण व्याखेनुसार: एखाद्या व्यक्तीला तापासह तीव्र श्वसन संसर्ग आढळल्यास≥ 38◦C तसेच मागील 10 दिवसात खोकला.
- एसएआरआयसंदर्भात डब्ल्युएचओची व्याख्या: एखाद्या व्यक्तीला तापासह श्वसन संसर्ग ≥ 38◦C आणि गेल्या 10 दिवसांपासून खोकला आणि रुग्णालयात नेण्याची आवश्यकता.
- कोविड-19 संशयित/पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या आघाडीवरील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी योग्य पीपीईंचा वापर करावा.
- प्रक्रियेपूर्वी संसर्ग होण्याची शक्यता कमी करण्यासाठी वैकल्पिक शस्त्रक्रियेपूर्वी 14 दिवसांच्या गृह अलगीकरणाची शिफारस करण्यात आली आहे.