जिल्ह्यातील चार टोळ्यातील 18 जण तडीपार जिल्हा पोलीस प्रमुखांची मोठी कारवाई : नागरिकांतून समाधान


स्थैर्य, सातारा, दि. ०५ : जिल्ह्यात मारामारी, खुन, खुनाचा प्रयत्न, घरफोडी अशा गंभीर गुन्हे करून दहशत माजवणार्‍या चार टोळीतील 18 जणांना पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातून तडीपार केले आहे. यातील दोन टोळ्या सातारा परिसरातील आहेत तर एक टोळी वाई तालुका आणि एक टोळी कराड परिसरातील आहे.
याबाबत माहिती अशी, सातारा शहर परिसरात टोळीचा प्रमुख आमीर इम्तियाज मुजावर वय 22 वर्षे रा. पिरवाडी, ता. सातारा, आमीर सलीम शेख, वय 19 वर्षे (टोळी सदस्य) रा. वनवासवाडी, कृष्णानगर सातारा, अभिजीत उर्फ आबु राजु भिसे वय 18 रा. आदर्शनगरी शेजारी सैदापूर, ता. सातारा, सौरभ उर्फ गोट्या संजय जाधव वय 20 सैदापूर, ता. सातारा, जगदीश रामेश्‍वर मते वय 20 रा. रांगोळे कॉलनी, शाहुपुरी, सातारा, आकाश हणमंत पवार वय 20 रा. सैदापूर, ता. सातारा यांची टोळी तयार झाली होती. सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुन, गर्दी मारामारी, दरोडा, दुखापत करणे हिंसाचार व मालमत्तेबाबत गुन्हे ही टोळीने करीत होती. या टोळीतील प्रस्तावित सहाजणांना हद्दपार करण्याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून प्रस्ताव सादर केला होता. टोळीकडून जिल्ह्यात हिंसक घटना घडून दहशत निर्माण होवू नये म्हणून पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी त्यांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपारी आदेश केला आहे.
त्याचप्रमाणे शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडी, चोरी, मारामारी करणारी टोळी बनली होती. या टोळीचा प्रमुख सागर नागराज गोसावी वय 23 रा. यशवंतनगर, सैदापूर, ता. सातारा, विपूल तानाजी नलवडे, वय 20 रा. वायदंडे कॉलनी, यश ढाब्यापाठीमागे, सैदापूर, ता. सातारा, अक्षय रंगनाथ लोखंडे वय 20, रा. जाधव चाळीच्या पाठीमागे, सैदापूर, ता. सातारा, अर्जुन नागराज गोसावी वय -35 वर्षे रा. यशवंतनगर, सैदापूर, ता. सातारा, रवी निलकंठ घाडगे वय 25 वर्षे रा. यशवंतनगर, सैदापूर, ता. सातारा या टोळीतील पाचजणांना हद्दपार करण्याबाबत शाहुपूरी पोलीस ठाण्यातून प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार पोलीस अधीक्षकांनी आरोपींना दोन वर्षांसाठी हद्दपारीचा आदेश दिला आहे.
वाई पोलीस ठाणे हद्दीत गर्दी मारामारी, दुखापत करणे, सरकारी कामात अडथळा करुन सरकारी नोकरास गर्दी मारामारी करुन गंभीर दुखापत करणे, अनाधिकृत घरात प्रवेश करुन मोठी दुखापत करुन मारामारी करुन जातीवाचक शिवीगाळ दमदाटी करणे, असे गंभीर गुन्हे करीत असलेल्या टोळीचा प्रमुख  रॉकी निवास घाडगे वय 29, कृष्णा निवास घाडगे वय 23,  सनी निवास घाडगे वय 30 सर्व रा. लाखानगर, सोनगिरवाडी वाई अशा तिघांना हद्दपार करण्याचा वाई पोलीस ठाण्यातून प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार त्यांना जिल्हा हद्दीतून एक वर्षासाठी हद्दपारीचा आदेश केला आहे.
कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, गर्दीमारामारी, दुखापत करणे असे गंभीर गुन्हे असलेल्या टोळीचा प्रमुख आशिष अशोक पाडळकर 32 रा. मलकापूर, ता. कराड, इंद्रजित हणमंत पवार, वय 24 रा. मलकापूर, ता. कराड, अनिकेत रमेश शेलार वय 21 रा. मलकापूर, ता. कराड, सुदर्शन हणमंत चोरगे वय 20 रा. कोयना वसाहत कराड अशा चौघांना हद्दपार करण्याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यामार्फत प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार पोलीस अधीक्षकांनी त्यांना पुर्ण सातारा जिल्हा व लगतच्या सांगली जिल्हयातील कडेगाव, वाळवा, शिराळा तालुका हद्दीतून दोन वर्षांसाठी हद्दपारीचा आदेश केला आहे.
या चारही टोळीतील 18 इसमांचेवर प्रतिबंधक कारवाई करुनही त्यांचे संशयीत हालचालीस प्रतिबंध झालेला नाही. त्यामुळे नागरीकांचे फार मोठे आर्थिक व शाररीक नुकसान झाले आहे. त्यांना कायद्याचा धाक नसून ते बेकायदेशीर कारवाया करीत आहेत. सुधारण्याची संधी देवूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती. त्यांचा सर्वसामान्य जनतेस उपद्रव होत होता. जनतेमधुन त्यांच्यावर कडक कारवाईची  मागणी होत होती. त्यामुळे पोलीस अधीक्षक सातारा यांनी हद्दपारीचे आदेश काढले असून 48 तासाचे आत त्यांना हद्दपार केलेल्या क्षेत्राबाहेर गेले जाण्याचे आदेश काढले आहेत.
हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाचे वतीने  अपर पोलीस अधीक्षक धिरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे किशोर धुमाळ, कराड शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, स.पो.नि.विजय गोडसे, कराड शहर पोलीस ठाण्यातील डी.बी.स्टाफ, सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे, शाहुपुरी पोलीस ठाणेचे स.पो.नि. व्ही. के. वायकर, वाई पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, एलसीबीचे सहाय्यक फौजदार मधुकर गुरव यांनी योग्य पुरावा सादर केला.

Back to top button
Don`t copy text!