
स्थैर्य, खटाव, दि. ०७ : खबालवाडी ता. खटाव येथे बाधित महिलेच्या निकट सहवासातील एक 45 वर्षीय पुरुष आणि 17 वर्षीय युवतीचा अहवाल बाधित आल्यामुळे आता बाधितांची संख्या तीनवर जाऊन पोहचली आहे.
3 ऑगस्ट रोजी येथील 70 वर्षाच्या महिलेचा अहवाल बाधित आला होता. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून बाधित महिलेच्या निकट सहवासातील चौंघाना खटाव येथे संस्था क्वारंटाईंन करण्यात आले होते. त्यानंतर त्याचौघांचे स्वब तपासणी साठी पाठवले होते. यापैकी काल एक पुरुष आणि एक युवतीचा अहवाल बाधित आला आहे. तर एक महिला आणि एक युवकाचा अहवाल मात्र निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्या घराच्या जवळच्या सुमारे 16 लोकांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे.
कोरोनाची साखळी वाढू नये याकरिता ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सावित्री पवार, उपसरपंच नितीन शिंदे, ग्रामसेवक सुर्यकांत सुळे, आरोग्यसेवक डी.सी.भोगले परस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे.ग्रामपंचायतीच्या वतीने परिसर निर्जंतुक करण्यासाठी औषध फवारणी तसेच आरोग्य विभागाच्या वतीने देखील लोकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. घरोघरी जाऊन ताप थंडी खोकला सर्दी आजाराची लक्षणे दिसून येतात काय याची माहिती अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका मदतनीस याच्या वतीने संकलीत करण्यात येत आहे. दरम्यान खटाव पंचायत समितीचे माजी सभापती संदीप मांडवे यांनी खबालवाडीला भेट देऊन माहिती घेऊन लोकांनी घाबरून जाऊ नये. प्रशासनाने दिलेल्या सुचनाचे पालन केले तर कोरोनावर मात करता येते असा दिलासा दिला.