16 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 561 जणांचे नमुने पाठविले तपासणीला तर 3 बाधितांचा मृत्यू


स्थैर्य, सातारा दि.10 : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या  16 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले आहे तर जिल्ह्यातील 3 बाधितांचा मृत्यू झाल्या असल्याची  माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

घरी सोडण्यात आलेल्यांमध्ये  वाई तालुक्यातील सह्याद्रीनगर येथील 39 वर्षीय महिला व 30, 60 वर्षीय पुरुष, कवठे येथील 28 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरुष,  ओझर्डे  येथील 39 वर्षीय महिला, चिंदवली येथील 28 वर्षीय पुरुष,

माण  तालुक्यातील काळेवाडी येथील 42 वर्षीय पुरुष, म्हसवड येथील 26 वर्षीय महिला, 11 वर्षीय बालिका व 50, 27 वर्षीय पुरुष

सातारा  तालुक्यातील नागठाणे येथील 45 वर्षीय महिला

कराड  तालुक्यातील मलकापूर येथील 29 वर्षीय पुरुष, येलगाव येथील 28 वर्षीय महिला, विद्यानगर सैदापूर येथील 26 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.

3 बाधितांचा मृत्यू

कृष्णा हॉस्पिटल कराड येथे पाटण तालुक्यातील कुंभारगाव येथील 42 वर्षीय पुरुष, कराड तालुक्यातील लटकेवाडी, सावडे येथील 52 वर्षीय पुरुष, या दोन बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.  तर फलटण तालुक्यातील पाडेगाव येथील 62 वर्षीय पुरुष याचा दि. 8 जुलै रोजी मृत्यू झाला असून त्याचा दि. 7 जुलै रोजी शिरवळ येथे घेण्यात आलेला नमुना पॉझीटिव्ह असल्याचे पुणे प्रयोगशाळेने कळविले आहे. उपचारासाठी दवाखान्यात नेत असताना लोणंद येथे मृत्यू झाल्याचे कळविण्यात आले आहे.   

561 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 18, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 42, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील  77, फलटण येथील 43,कोरेगांव येथील 37, वाई येथील 42, शिरवळ येथील 164, रायगाव येथील 17, पानमळेवाडी येथील 10,मायणी येथील 13, दहिवडी येथील 56, खावली येथील 24, तळमावले येथील 18 असे एकूण 561 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन एन.सी.सी.एस. पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!