दैनिक स्थैर्य | दि. १५ सप्टेंबर २०२४ | फलटण |
जिल्हाधिकारी आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी गेल्या ४० दिवसांत शेतजमिनींसंदर्भात फलटण तालुक्यातून आलेली जवळपास १५५ पेक्षा जास्त अपील प्रकरणे निकाली काढण्यात आलेली आहेत. शेती महामंडळाच्या एक एकरपेक्षा कमी जमीन देय असणार्या १२९ पैकी ९६ शेतकर्यांच्या वाटपासाठीचा अंतिम नमुना ३ प्रसिद्ध झाला असून जमीन वाटपाची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे.
एखाद्या दुसर्या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा अपवाद वगळता जवळपास ५ सप्टेंबरपर्यंत निकालासाठी बंद करण्यात आलेली सर्व प्रकरणे निर्णयांकीत करण्यात आलेली आहेत.
फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याकडे असलेली यासंदर्भातील प्रकरणे त्यांनी तातडीने निकाली काढली आहेत. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी फलटण तालुक्याचा कार्यभार स्वीकारल्यापासून त्यांनी कामाचा धडाका लावून आपल्या कार्याचा ठसा जनमानसात उमटविला आहे.