15 नागरिकांचा रिपोर्ट आले पॉझिटिव्ह

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


3 जणांचा मृत्यु पश्चात रिपोर्ट निगेटिव्ह तर कोळकी येथील बाधिताचा मृत्यु : 208 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह

स्थैर्य, सातारा दि. 3 : रात्री उशिरा आलेल्या रिपोर्टनुसार कोरेगाव तालुक्यातील कटापूर येथील 62 वर्षीय पुरुष, 24 व 55 वर्षीय महिला, जावली तालुक्यातील वाहगाव येथील 34 वर्षीय पुरुष, काटवली येथील 29 वर्षीय पुरुष व 56 वर्षीय महिला, सातारा तालुक्यातील वावदरे येथील 45 वर्षीय महिला, माणगाव-अतित येथील 35 वर्षीय पुरुष, पाटण तालुक्यातील जांभेकरवाडी येथील 2 वर्षीय बालक, दिवशी मारुली येथील 29 वर्षीय पुरुष, नवसारी येथील 55 वर्षीय सारी आजाराचा पुरुष, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 55 वर्षीय महिला, माण तालुक्यातील दहिवडी येथील 19 वर्षीय युवक, कराड तालुक्यातील तुळसण येथील 62 वर्षीय सारी आजाराचा पुरुष, फलटण तालुक्यातील कोळकी येथील 54 वर्षीय सारी आजाराचा पुरुष, असे एकूण 15 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

3 जणांचा मृत्यु पश्चात अहवाल निगेटिव्ह

बोपेगाव ता. वाई येथील 85 वर्षीय महिला, गिरवी ता. फलटण येथील 65 वर्षीय महिलेचा व वेळेकामती ता. सातारा येथील 59 वर्षीय पुरुषाचा मृत्यु पश्चात घेण्यात आलेला नमुना निगेटिव्ह आला आहे.

कोळकी येथील एका कोरोना बाधिताचा मृत्यु

फलटण तालुक्यातील कोळकी येथे मुंबईवरुन प्रवास करुन आलेला 54 वर्षीय कोरोना बाधितचा मृत्यु झाला आहे.

208 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

काल रात्री   प्राप्त झालेल्या अहवालानुसार 208 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.

मुंबई येथे खासगी प्रयोगशाळेत तपासणी करुन आलेल्या दिवड ता. माण येथील 29 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या त्यांना क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय,सातारा येथे दाखल करुन उपचार सुरु आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!