चौदा वर्षाच्या बालिकेचे अपहरण करून दागिने चोरले ; रात्री उशिरापर्यंत शोधाशोध केल्यानंतर सुदैवाने सापडली बालिका

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ७ जुलै २०२१ । सातारा । चौदा वर्षाच्या बालिकेचे अपहरण करून कान व नाकातील दागिने काढून घेण्याचा प्रकार काल रात्री शाहूपुरी परिसरात समोर आला आहे. या मुलीच्या कानाजवळ रक्त आल्याचेही आढळून आले आहे. याबाबत संबंधित मुलगी व तीच्या नातेवाइकांकडे चौकशी सुरू होती.

शाहुपूरीतील गजानन महाराज मंदिर परिसरात ही घटना घडली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार संबंधित मुलगी व तिची लहान बहिण काल सायंकाळी साडेसातच्या सुमारास वडीलांसोबत घराजवळील मैदानात फिरायला निघाले होते. या वेळी मी बाथरूमला जाऊन येते तुम्ही पुढे जा असे ती मुलगी वडीलांना म्हणाली. त्यामुळे वडील दुसर्‍या मुलीसोबत फिरायला गेले. अर्ध्या तासाने ते घरी आले. यावेळी मुलगी घरात नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर वडिलांनी याबाबतची माहिती परिसरातील नागरिकांना दिली. वॉटसअप ग्रुपवरूनही ही माहिती देण्यात आली. त्यामुळे थोड्याच वेळात तेथे दोनशे ते अडीचशे लोक जमा झाले. माजी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब गोसावी त्यामध्ये होते. जमावातील काही लोकांनी बॅटरी व काठ्या घेऊन परिसरातील झोपडपट्ट्यांमध्येही पाहणी केली.

रात्री उशिरापर्यंत शोधाशोध सुरू होती. या दरम्यान पहाटे एकच्या सुमारास शाहूपुरी राहणारे एकजण दुचाकीवरून मेढ्यावरून आंबेदरे रोडने सातार्‍याकडे होते. शाहूपुरी चौकाच्या अलीकडे संबंधित मुलगी त्यांना चालत जाताना दिसली. त्यांनी तिला माहिती विचारून घरी आणले. याबाबतची माहिती मिळाल्यावर शाहूपुरी पोलिसांनी तिच्या घरी जाऊन चौकशी केली. परंतु, मुलगी भेदरलेली असल्याने जास्त बोलू शकली नाही. आज सकाळी अकराच्या सुमारास पोलिसांनी तीला व पालकांना पोलिस ठाण्यात बोलावले होते. प्रकरणाची माहिती घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली होती. मुलीच्या कान व नाकातील सुमारे साडेतीन ग्रॅमचे दागिणे आढळून आलेले नाहीत. तसेच त्या ठिकाणी रक्त आल्याचेही दिसत असल्याची माहिती मिळाली आहे.


Back to top button
Don`t copy text!