
स्थैर्य, सातारा दि. 25 : कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड व एन. सी.सी.एस. पुणे यांच्याकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार 14 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
यामध्ये पाटण तालुक्यातील शितापवाडी येथील 72 वर्षीय पुरुष, पालेकरवाडी (बहुले ) येथील 50 वर्षीय पुरुष व 65 वर्षीय महिला. कराड तालुक्यातील रेठरे खुर्द येथील 45 वर्षीय महिला, तारुख येथील 20,40,56,40 व 45वर्षीय पुरुष व 7 वर्षीय मुलगी. वाई तालुक्यातील कवठे येथील 20 वर्षीय पुरुष, एकसर येथील 25 वर्षीय पुरुष. कोरेगांव तालुक्यातील पिंपोडे येथील 35 वर्षीय पुरुष. सातारा तालुक्यातील लिंब (शेरे) येथील 36 वर्षीय पुरुष.