स्थैर्य, सातारा दि. 13 : काल सायंकाळी क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय, सातारा येथे वाई तालुक्यातील बावधन येथील 53 वर्षीय महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे. ती महिला सुरुवातीपासून ह्दयविकार व फुफ्फुसाचे आजाराची रुग्ण होती. दहा दिवसांपासून घरीच श्वसनाचा त्रास चालू झाल्याने तिला वाई मधील खाजगी हॉस्पिटलमध्ये दि. 8 ते 12 जून पर्यंत ती दाखल करण्यात आले होते. त्रास वाढल्यामुळे तिला क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय, सातारा येथे पाठविण्यात आले होते. त्या महिलेचा मुलगा व सून दहा दिवसांपूर्वी मुंबईहून घरी आले होते. त्या मृत महिलेचा कोविड संशयित म्हणून नमुना पुणे येथे पाठविण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
138 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह
रात्री उशिरा एन.सी.सी.एस. पुणे यांनी 138 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे कळविले आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर कळविली आहे.
आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 718 रुग्ण आढळले आहेत. 472 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. विविध रुग्णालयांमध्ये 213 जणांवर उपचार सुरु असून 31 जणांचा मृत्यु झालेला आहे.