दैनिक स्थैर्य | दि. २५ जून २०२४ | फलटण |
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डुडी, शासकीय रुग्णालय, साताराचे सर्जन डॉ. युवराज करपे, अतिरिक्त सिव्हील सर्जन डॉ. राहुलदेव खाडे, जिल्हा सल्लागार डॉ. दिव्या परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वत्र कार्यवाही सुरू आहे.
या कार्यवाही अंतर्गत सोमवार, दि. २४ जून २०२४ रोजी फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीत सौ. दिपाली जगताप (सायकॉलॉजीस्ट), सौ. इला ओतारी (सोशल वर्कर) तसेच फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई जितेंद्र टिके आणि पोलीस शिपाई संदीप ठणके यांनी संयुक्त कार्यवाही करीत कलम ४, ५, ६(ब) सिगरेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरात मनाई आणि व्यापार व वाणिज्य उत्पादन आणि वितरण नियमन) कायदा, २००३ म्हणजेच उजढझअ २०२३-२५ अन्वये ऐकून १३ केसेस करून रू.५,१००/- दंड वसुल केला आहे.