दैनिक स्थैर्य | दि. १३ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर विभागातर्फे आयोजित केलेल्या एच.एस.सी. (१२ वी) बोर्ड परीक्षा फेब्रुवारी/मार्च २०२४ ची विज्ञान शाखेची परीक्षा बुधवार, दि. २१ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू होत आहे.
मुधोजी हायस्कूल व ज्युनि. कॉलेज, फलटण केंद्र क्र. ०१०१ येथे विज्ञान शाखेच्या बैठक क्रमांक द ०१२८६३ ते द ०१३७०५ या केंद्रावर एकूण ८४३ विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था प्रशालेत केलेली आहे. सर्व विद्यार्थी व पालकांनी याची नोंद घेऊन परीक्षा केंद्रावर बोर्डाने प्रकाशित केलेल्या अधिकृत वेळापत्रकाप्रमाणे प्रवेशपत्र (रिसीट), ओळखपत्र व लेखन साहित्य घेऊन शालेय गणवेशात वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर उपस्थित रहावे.
उशिरा येणार्या विद्यार्थ्यास परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. विद्यार्थ्याने परीक्षा केंद्राच्या आवारात भ्रमणध्वनी (मोबाईल), टॅबलेट, इलेक्ट्रॉनिक घडयाळ, पॉकेट कॅलक्युलेटर वा तत्सम इलेक्ट्रॉनिक साधने किंवा उपकरणे बाळगण्यास सक्त मनाई आहे.
विद्यार्थ्याने कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब न करता कॉपीमुक्त वातावरणात निर्भयपणे परीक्षा द्यावी. तसेच परीक्षा व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्राचार्य गंगवणे बी. एम., केंद्रप्रमुख शिंदे व्ही. जी., उच्च माध्यमिक विभागाचे उपप्राचार्य देशमुख डी. एम., उपप्राचार्या सौ. माळवदे एस. ए., पर्यवेक्षक जगताप एन. एम., पर्यवेक्षिका सौ. पाटील पी. व्ही. यांनी केले आहे.