दैनिक स्थैर्य | दि. १५ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर विभागातर्फे आयोजित केलेल्या एच.एस.सी. बोर्ड परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२३ ची मुधोजी हायस्कूल व ज्युनि. कॉलेज फलटण (केंद्र क्र. ०१०१) येथे विज्ञान शाखेची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२३ पासून सुरू होत आहे.
मुधोजी हायस्कूल फलटण येथे विज्ञान शाखेच्या बैठक क्रमांक द०११९९६ ते द०१२८७४ या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था मुधोजी हायस्कूल येथे केलेली आहे. यामध्ये मालोजी विभाग, लक्ष्मीदेवी विभाग, व्यंकटेश विभाग व किशोरसिंह विभागामध्ये ही बैठक व्यवस्था केली जाणार आहे. या बैठक व्यवस्थेची १२ वी विज्ञान शाखेच्या सर्व विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मुधोजी हायस्कूल केंद्राचे केंद्रप्रमुख फडतरे एम. के. व प्राचार्य बी.एम. गंगवणे यांनी केले आहे.
विद्यार्थ्याने केंद्रावर बोर्डाने प्रकाशित केलेल्या अधिकृत वेळापत्रकाप्रमाणे प्रवेश पत्रिका (रिसीट), ओळखपत्र (आयडेंटीटी कार्ड) व लेखन साहित्य घेऊन शालेय गणवेशात परीक्षेच्या वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर उपस्थित रहावे. उशिरा येणार्या विद्यार्थ्यास परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही.
विद्यार्थ्याने परीक्षा केंद्राच्या आवारात भ्रमनध्वनी (मोबाईल), टॅबलेट, इलेक्ट्रॉनिक घडयाळ, पॉकेट कॅलक्युलेटर वा तत्सम इलेक्ट्रॉनिक साधने / उपकरणे बाळगण्यास सक्त मनाई केली गेली आहे. तसेच विद्यार्थ्याने कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब न करता कॉपीमुक्त वातावरणात निर्भयपणे परीक्षा दयावी. परीक्षा व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुधोजी हायस्कूल केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. फडतरे एम. के. व प्राचार्य श्री. बी.एम. गंगवणे, उपप्राचार्य श्री. ए. वाय. ननवरे, पर्यवेक्षक श्री. एस.एम. काळे यांनी केले आहे.